पान:डी व्हँलरा.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शमीवृक्षावर शस्त्रविसर्जन १३३ लोक दिसायला मूठभर आणि अल्पसंख्याकच दिसतात. अशा वेळीं बेअकली शेळ्यामेंढ्यांना ज्याप्रमाणे गुराखी बडगे मारून हिरव्या कुरणावर दामटीत नेऊन चरावयास लावतो, त्याप्रमाणे अज्ञानी आणि मूढ़ बहुसंध्येवर प्रसंग पडल्यास बंदुका झाडून त्यांना त्यांच्या हिताच्या गोष्टीकडे वळविणे भाग असते. अशा वेळीं अल्पसंख्याकांनी हत्यार चालविलें तरी त्यांत कांहीं अधर्म नाहीं. ही विचारसरणी कोणाला पटो वा न पटो, डी व्हॅलेराच्या पक्षाचे लोक कोणत्या दिशेने विचार | करीत होते व ते आपल्या भाईबंदांवर शस्त्र चालविण्यास कां उद्युक्त | झाले होते, त्याचा थोडासा उलगडा या उत्तरावरून होण्यासारखा आहे येवढे खास. मात्र हेही तितकेच खरें, कीं डी व्हॅलेराचा पक्ष कितीही उच्च तत्त्वांनी प्रेरित झालेला असला किंवा त्याच्या हातून घडणा-या अत्या चारांत स्वदेशहिताखेरीज दुसरा कोणताही हेतु नसला तरी आयर्लंडां|तील बहुजनसमाजाची सहानुभूति त्या पक्षाजवळ यापुढे राहिली नव्हती. शांततेच्या काळासाठी आयरिश जनता आतां अतिशय | भुकेलेली होती. पदरात पडलेले फ्री-स्टेट अगदी शंभर नंबरी स्वराज्य | नसले तरी त्याचा स्वीकार करून साधल तितके देशहित साधणे हेच अधिक शहाणपणाचे होय असे सर्वांना वाटू लागले होते. त्यामुळे फ्री- स्टेटच्या चालत्या गाड्याला खीळ घालं पाहणा-या डी व्हॅलेराच्या पक्षाविषयीं आयरिश जनतेला सहानुभूति वाटणे शक्य नव्हते, आणि त्या पक्षाचे अत्याचार बंद करण्यासाठी फ्री-स्टेट सरकारने कितीही कडक उपाय योजले तरी लोकांना ते वावगे वाटत नव्हते. हे सर्व जाणूनच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यांत डी व्हॅलेरानें आपल्या पक्षांतील लोकांस हुकूम सोडून फ्री-स्टेटविरुद्ध चाललेली लढाई तहकूब केली असल्याचे जाहीर केले. डी व्हॅलेराच्या या कृत्याने कांहीं लोकांना आशा वाटू लागली, की कदाचित् फ्री-स्टेटशीं समेट