१३२ १३२ ।। डी व्हॅलेरा । प्रजासत्तावादी पुढारी जमले होते तेही पकडले गेले. यानंतर थोड्याच दिवसांनी, म्हणजे एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यांत डी व्हॅलेराच्या पक्षाचा फडनवीस ऑस्टिन स्टॅक हा ले.नमलच्या डोंगरांत फ्री-स्टेटच्या लष्कराच्या हातीं सांपडला, आणि प्रजासत्तावादी पक्षाचे बहुतेक सर्व अध्वर्यु नाहींसे होऊन डी व्हॅलेरा व कांहीं मूठभर अनुयायी यापलीकडे त्या पक्षांत कांहीं त्राण उरलें नाहीं. | १९२३ च्या या उलटसुलट अत्याचारांच्या हकीकती वाचल्या म्हणजे असा एक प्रश्न साहजिकपणेच मनाला सुचतो, कीं इंग्लंडशीं तह होऊन फ्री-स्टेटची स्थापना झाल्यानंतर आणि आयरिश जनतेच्या बहुमताचाही पाठिंबा फ्री-स्टेटलाच असल्याचे प्रत्ययाला आल्यानंतरही आपल्याच तत्त्वांना हटवादीपणाने चिकटून राहून, व निर्भेळ स्वराज्याची स्थापना करण्याचे अशक्य ध्येय उराशी धरून फ्री-स्टेटचा कारभार बंद पाडण्यासाठी आपल्याच हजारों देशबांधवांच्या जीवितावर आणि मालमत्तेवर घाले घालण्यांत डी व्हॅलेराने काय साधलें ? या प्रश्नाचे इतरांनी उत्तर देण्यापेक्षां डी व्हॅलेराच्या एखाद्या अनुयायाकडून मिळालेले उत्तरच अधिक मननीय होईल. * मॅचेस्टर गार्डियन' पत्राचा एक खास प्रतिनिधि आयर्लंडमधील परिस्थिति प्रत्यक्ष पहावयास गेला असतांना त्याने हाच प्रश्न एका प्रजासत्तावादी सैनिकाला विचारला. तेव्हां त्या सैनिकाने उत्तर दिले, “ज्या तहाअन्वयें फ्री-स्टेट अस्तित्वात आलें तो तहच मुळीं सबंद राष्ट्राला मान्य आहे असे म्हणता येत नाही. कारण, त्या तहावर देशांतील सर्व स्त्रीपुरुषांची मते केव्हाही घेण्यात आली नाही. शिवाय, अमुक एका गोष्टीला लोकांचे बहुमत अनुकूल आहे म्हणून ती चांगली असलीच पाहिजे असा थोडाच सिद्धान्त आहे ? कधीं कधीं लोक मोहाने, अज्ञानाने किंवा मूर्खपणाने भलत्याच दिशेला झुकतात, आणि देशाचे ज्यांत खरे हित आहे अशी तत्त्वे डोळ्यांपुढे ठेवून त्याप्रमाणे वागणारे सुज्ञ
पान:डी व्हँलरा.pdf/140
Appearance