पान:डी व्हँलरा.pdf/139

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शमीवृक्षावर शस्त्रविसर्जन १३१ शहरांतील निरनिराळ्या ठिकाणी २ मार्च रोजी रात्रीं फ्री-स्टेटच्या लष्कराने अवचित छापे घातले, व ते यशस्वीही झाले. एकंदर ११० लोकांना पकडण्यात आले. त्यांत १९ स्त्रिया होत्या. या छाप्यामुळे डी व्हॅलेराच्या पक्षाला मोठाच धक्का बसला, व फ्री-स्टेटच्या या कृत्याबद्दल निषेध व्यक्त करण्याकरितां आयरिश जनतेने एका विशिष्ट दिवशी बाजार, शाळा, शर्यती, करमणुकी, वगैरे सर्व प्रकारचा व्यवहार बंद ठेवून हरताळ पाळावा अशी डी व्हॅलेराने जाहीर विनंति केली. डी व्हॅलेराच्या या विनंतीप्रमाणे लोकांनी हरताळ पाळला तर सामान्य लोकमत त्याच्या बाजूचे आहे असे पर्यायाने सिद्ध होईल, जाणून फ्री-स्टेटमें लष्करी सैन्याच्या खड्या पहान्यांत लोकांचे सामान्य व्यवहारच नव्हे तर नाटकतमाशेही पार पाडले, व डी व्हॅलेराच्या हरताळाला पूर्ण हरताळ फासल्याचा आनंद उपभोगिला. याचा सूड म्हणून, प्रजासत्तावाद्यांनी मार्च महिन्याच्या तिस-या आठवड्यांत फ्री-स्टेटच्या अधिका-यांच्या व त्यांच्या आप्तेष्टांच्या घरांवर घाले घालून अनेक प्रकारची क्रूर कृत्यें केलीं. उलट क्री-स्टेटच्या लष्करानेही प्रजासत्ताकपक्षाला कायमचा नामशेष करण्यासाठी कमर कसली. डी व्हॅलेरा व त्याचे प्रमुख साथीदार यांना अचानक पकडण्यासाठी फ्री-स्टेटच्या लोकांनी त्यांच्या हालचाली| वर पाळत ठेवून एके दिवशीं एका शेतांतील पडळींत त्यांची गुप्त बैठक भरली असता त्यांजवर निकराचा हल्ला केला. या हल्लयांत डी व्हॅलेराच पकडला जावयाचा, पण त्याच्या सुदैवाने त्याला हात दिला. आपला नायक शत्रूच्या हाती लागणार अशीं स्पष्ट चिन्हें दिसतांच सेनापति लिपॅम लिंच याने पुढे होऊन फ्री-स्टेट सैन्याच्या तुकडीस थोपवून धरले, आणि त्यामुळे डी व्हॅलेराला सुरक्षितपणे पळून जाण्यास अवकाश मिळाला. या झटापटींत लिपॅम लिंच मेला, | आणि खेरीज लिंचच्या दफनविधीसाठीं क्लोनमल येथे देशभक्त मॅकस्विनीची बहीण मिस् मॅकस्विनी, कौंट प्लंकेट, लिंचचा भाऊ वगैरे निवडक