पान:डी व्हँलरा.pdf/13

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धिटुकला मुलगा प्रेम तिळभही कमी झाले नाही. आपल्या घराण्यांतील स्त्रीपुरुषांनी वेळोवेळीं स्वदेशासाठीं अतुल स्वार्थत्याग केला आहे व आपणही आपल्या घराण्याची उज्ज्वल परंपरा कायम राखली पाहिजे अशी महत्त्वाकांक्षा तिने ठेवलेली होती. | अशा मातापितरांच्या पोटी १८८२ सालीं डी व्हॅलेराचा जन्म झाला त्या वेळीं आयर्लंडमध्ये काय स्थिति होती ? आपल्या चिमुकल्या लुसलुशीत मुठी तोंडांत घालून एखाद दुस-या बोबड्या अक्षराचा उच्चार करीत पाळण्यांत पडलेल्या तान्ह्या डी व्हॅलेराच्या कानीं कोणते आवाज । पडत होते ? आयलंड सुखासमाधानांत होते काय ? शंभर वर्षांपूर्वी आयर्लंडला पार्लमेंटची सुधारणा इंग्लंडकडून मिळाली तिचा शतसांवसरिक उत्सव करण्यांत आयलंडचे लोक हर्षमग्न झालेले होते काय ? या प्रश्नांचे उत्तर त्या वेळी सान्या अमेरिकेभर हिंडून लोकांना आयर्लंडच्या स्थितीविषयी जागृत करणान्या मिशेल डेव्हिटकडून चांगले मिळालें असते. आयर्लंडमधील लोकांच्या अनंत दुःखांची कहाणी सांगण्याखेरीज त्याला कांहीं बोलावयास दुसरा विषयच नव्हता. त्याच्या करुण कहाणीचे पडसाद अमेरिकेतील प्रत्येक खेड्यांत आणि दयाखो-यांत ऐकावयास येत होते. आयर्लंडमध्ये फॉस्टरच्या दडपशाहीच्या कायद्याचा अमल जारीने सुरू होता. पार्नेल, डिलन, सेक्स्टन वगैरे आयरिश पुढा-यांना इंग्रज सरकारने तुरुंगात टाकले होते. जुलूम व अन्याय हेच सरकारचे धोरण होऊ पहात होते. लोकांमध्ये जागृति उत्पन्न होऊ लागली होती, आणि संपूर्ण स्वराज्याच्या निकराच्या युद्धाला लवकरच तोंड लागणार अशीं स्पष्ट चिन्हें दिसत होतीं ! याच युद्धाचे धुरीणत्व पुढे डी व्हॅलेराच्या हातीं यावयाचे होते ! १८८४ सालीं डी व्हॅलेराचा बाप फार आजारी पडला व कांहीं दिवसांनी त्या दुखण्यांतच त्याचा अंत झाला. पतिनिधनानें शोकमग्न झालेल्या डी व्हॅलेराच्या आईला दोन वर्षांच्या मुलाचे संगोपन कर