पान:डी व्हँलरा.pdf/138

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१३० डी व्हॅलेरा । फाशीची शिक्षा देण्यात येईल. हा नुसता शाब्दिक हुकूम सोडून स्वस्थ न बसतां फ्री-स्टेटने सात लोकांना बिगर परवाना हत्यारे बाळगल्याबद्दल फांसावर चढविले. या प्रकाराने प्रजासत्तावाद्यांना दहशत बसण्याचे लांबच राहून त्यांनी चिडून जाऊन आपल्या अत्याचारांचे प्रमाण अधिकच वाढविलें. फेब्रुवारी महिन्यांत त्यांचे अत्याचार अगदीं। कळसाला पोंचले. तुझे राहते घर जाळून खाक करू अशी धमकी देऊन डॉ० जॉर्ज सिगर्सन यास आयरिश पार्लमेंटच्या सभासदत्वाचा राजीनामा द्यावयास त्यांनी भाग पाडले, कॉर्कचा शेरीफ रसेल आणि विक्लो परगण्यांतील कर्नल पॉड यांची घरे जाळून बेचिराख केली, फ्री-स्टेटचे एक मंत्र ओहिगिन्स यांच्या घरावर हल्ला करून त्यांच्या बापाला ठार केले, आणि डब्लिन कॅसल येथील सरकारी कचेरीच्या सर्व इमारती बाँब गोळ्यांच्या एका धडाक्याने उडवून देण्याचा व्यूहही त्यांनी रचला होता. तो सिद्धीस गेला नाही ही गोष्ट वेगळी. या अत्याचारपरंपरेला कंटाळून फ्री-स्टेटच्या बंदिखान्यांत असलेल्या कांहीं प्रजासत्तावाद्यांनी अशी विनंति केली, की आमची मुक्तता कराल तर आम्ही समेट घडन आणण्याची खटपट करूं. या त्यांच्या विनंतीवरून त्यांना मुक्त करण्यात आले. परंतु समेट घडवून आणण्याच्या प्रयत्नांत त्यांना यश येण्याचे चिन्ह दिसेना. कारण प्रजासत्तावाद्यांनी आपला अत्याचारी हात आखडता घेतला नाही. उलट मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यांत त्यांनी डब्लिन येथील इनकम टॅक्सची कचेरी बाँब फेकून उडवून दिली. आयर्लंडांत सर्व ठिकाणी कडक लष्करी बंदोबस्त ठेवूनही प्रजासत्तावाद्यांना दारुगोळा मिळतो हे पाहून दारुगोळा व हत्यारे यांचा प्रजासत्तावाद्यांना पुरवठा करणारे त्यांचे साथीदार इंग्लंड व स्कॉटलंड या देशांत असले पाहिजेत असा फ्री-स्टेटने साहजिकच तर्क बांधला; आणि या साथीदारांचा समाचार घ्यावयाचे त्यांनी ठरविले. सर्व तयारी केल्यानंतर लंडन, मँचेस्टर, लिव्हरपूल, ग्लासगो वगैर