पान:डी व्हँलरा.pdf/137

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शमीवृक्षावर शस्त्रविसर्जन १२९ परंतु डी व्हॅलेराची ही प्रार्थना परमेश्वराने ऐकली नाही. कारण गेल्या सहा महिन्याचा आयर्लंडचा इतिहास पाहिला तर डी व्हॅलेराच्या वनवासी पक्षाने फ्री-स्टेट सरकारच्या इमारतींची जाळपोळ करावी, त्यांच्या अधिका-यांवर रात्री बेरात्रीं हल्ले करावे किंवा रेल्वेच्या गाड्या उलथून पाडाव्या, आणि फ्री-स्टेटच्या लष्कराने व्हॅलेराच्या लोकांना अचानक पकडून ठार करावे, किंवा डी व्हॅलेरा व इतर पुढारी यांचा द-याखो-यांतून पाठलाग करावा, अशा उलटसुलट दंगलीखेरीज दुसरे कांहीं दिसून येत नाहीं. फ्री-स्टेट सरकारचा अंमल आयलंडांत सुरू झाल्यापासून डी व्हॅलेराच्या प्रजासत्ताक पक्षाचे लोक सरकारी रीतीने 'बंडखोर' ठरले, आणि लोकमताचा वाराही बहुतांशीं फ्री-स्टेटच्या बाजूने वाहू लागल्यामुळे सामान्य लोकही डी व्हॅलेराच्या अनुयायांना ‘बंडखोर' म्हणूनच ओळखू व संबोधू लागले. परंतु आपल्या ध्येयावर व तत्त्वांवर अढळ दृष्टि व श्रद्धा ठेवणाच्या प्रजासत्तावाद्यांनी बंडखोर' हैं दूषण भूषणासारखे मानून फ्री-स्टेटचा कारभार बंद पाडण्याचे अटोकाट प्रयत्न सुरू ठेवले. फ्री-स्टेटच्या मंत्रिमंडळांतील सभासदांना अचानक पकडून नेण्याचा नवीन उपक्रम त्यांनी आरंभिला. ३० जानेवारी रोजी बंगवेल नांवाच्या एका प्रमुख सभासदाला त्यांनी असेच पवून नेले, आणि लगच दोन दिवसांनी त्याला सोडून देऊन असे जाहीर केले, की प्रजासत्तावादी लोकांना फ्री स्टेटने कोणत्याही प्रकारचा त्रास देऊ नये म्हणून आजपर्यंत पळवून नेलेल्या फ्री-स्टेटच्या लोकांना आम्ही ओलीस ठेविलेले आहे. लगेच थोड्या दिवसांनी फ्री-स्टेटचा । अध्यक्ष कासग्रेव्ह याचा बंगला डी व्हॅलेराच्या लोकांनी पेटवून दिला, व स्लिगो येथील रेल्वे स्टेशन जाळून पार जमीनदोस्त करून टाकले. या जाळपोळीचा व दंग्याधाप्यांचा बंदोबस्त करण्याकरितां फ्री स्टेट सरकारने असा हुकूम काढला, कीं फ्री-स्टेटच्या परवान्याखेरीज हत्या बाळगणे हा भयंकर अपराध समजला जाईल, व त्या अपराधाबद्दल डा...९