पान:डी व्हँलरा.pdf/136

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण नववें शमीवृक्षावर शस्त्रविसर्जन नवजीवन देणारे व नवीन आशांकुर उत्पन्न करणारे १९२३ चें नवें संवत्सर उगवले. परंतु नवसंवत्सराची ती कोवळीं किरणें डी व्हॅलेराला विशेष आल्हादकारक वाटली नाहींत. मागील वर्षी सुरू झालेला त्याची अज्ञातवास संपला तर नव्हताच; उलट आतां तो कधं । संपेल किंवा नाही अशी चिंता वाटण्यासारखी परिस्थिति उत्पन्न झाली. रानावनांत गुप्त राहून दिवस काढण्याचा डी व्हॅलेरावर प्रसंग आला होता. त्याच्या शत्रुचे व मित्रांचे त्यांच्या हालचालींवर सारख्याच उत्सुकतेचे लक्ष होते. तो हात लागला, की त्याचा अंत करावयास त्याचे शत्रू टपून बसले होते, तर उलट डी व्हॅलेरा कोठे आहे, काय करीत आहे, तो पुन्हाँ कधीं प्रगट होईल काय, प्रजासत्ताक पक्षाचे सुदैव उघडून डी व्हलरा पुन्हा कधीं सत्ताधारी होईल काय, अशा प्रश्नांचा आपल्या निराश मनाशी विचार करीत डी व्हॅलेराचे मित्र त्याच्या बातमीची चातकासारखी वाट पहात होते. परंतु शत्रुमित्रांना सारखेच निराश करून अज्ञातवासांत कार्य करीत राहणेच डी व्हॅलेराने पसंत केले. मधूनच एखाद्या वृत्तपत्राच्या बातमीदाराला त्याची मुलाखत घ्यावयास मिळे, व तिची हकीगत तो प्रसिद्धही करी. पण त्यालासुद्धा डी व्हॅलेराचा ठावठिकाणा सांगता येत नसे. अशाच एका बातमीदारातर्फे डी व्हॅलेने आपला नवसंवत्सराचा संदेश आपल्या अनुयायांसाठीं जानेवारी महिन्यात प्रसिद्ध केला. त्यांत त्याने म्हटले होते, 4 नव्या वर्षाच्या सुमुहूर्तावर मायदेशासाठी स्वार्थत्याग करावयास आम्ही पुन्हा नव्या निश्चयाने तयार होत आहोत. प्रभूने आमच्यावर कृपादृष्टि ठेवावी, आणि आयलंडला स्वातंत्र्य व शांति मिळवून देण्याच्या आमच्या प्रयत्नास त्याचे मंगल आशीर्वाद असावेत येवढीच आमची प्रार्थना आहे."