पान:डी व्हँलरा.pdf/135

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रक्ताने माखलेले वर्ष १२७ स्टेटचे कलम आणि खर्चाच्या बाजूला शेंकडों स्त्री-पुरुषांचे खून, जाळपोळ आणि रक्तपात असल्याचे दिसून आले असते. रक्ताने माखलेले वर्ष' असेच या सबंद वर्षाचे वर्णन करणे भाग आहे. वर्षअखेर डी व्हॅलेराचा पक्ष अगदीं निष्प्राण झालेला होता. कोणत्याही शहरांत उघडपणे ठाणे देऊन फ्री-स्टेटशी झुंजण्याचे सामर्थ्य आतां त्या पक्षांत उरले नव्हते. डी व्हॅलेरा स्वतः कोठे आहे याविषयीं लोक नाना प्रकारचे तर्क करीत होते. त्याचा ठावठिकाण कोणालाच समजत नव्हता. द-याखो-यांत लपून छपून राहण्याची त्याच्यावर पाळी आली होती. पण डी व्हॅलेरा आपले प्रजासत्तेचे ध्येय सोडण्यास तयार नव्हता. त्याने अज्ञातवासांत राहूनही झुंजं चालविण्याचेच ठरविले,