पान:डी व्हँलरा.pdf/134

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२६ डी व्हॅलेरा होती, की कोणत्या संकटास कसे तोंड द्यावयाचे व कोणत्या वेळी परिस्थितीचा फायदा घेऊन आपले कार्य पुढे ढकलावयाचे याविषयींचे त्याचे व डी व्हॅलेराचे विचार तंतोतंत जुळत. १९२२ सालच्या बिकट परिस्थितीत चाइल्डर्ससारखा मुत्सद्दी मदतीला होता म्हणूनच डी व्हॅलेरास आपला पक्ष इतका तरी जिवंत ठेवता आला. तेव्हा चाइल्डर्सच्या मरणाने डी व्हॅलेराला काय वाटले असेल त्याचे स्पष्ट वर्णन करावयास पाहिजे असे थोडेच आहे ? । चाइल्डर्सच्या शिरच्छेदाने डी व्हॅलेराचा पक्ष अतिशय चिडून गेला व त्या खुनाचा सूड उगविण्यासाठी जो कोणी फ्री-स्टेटवाला हातीं लागेल त्याची कत्तल करण्याचा त्यांनी सपाटा चालविला. फ्रीस्टेट सैन्याच्या डब्लिन शहरच्या कांहीं कांहीं ठाण्यांवर त्यांनी हळही केले. परंतु त्यांच्या या गडबडीचा कांहींच परिणाम होईना. उलट फ्री-स्टेटची रीतसर परिणति व्हावयाची ती होतच होती. फ्री स्टेटच्या बिलाला कॉमन्स सभेची संमति पूर्वीच मिळाली होती. आतां डिसेंबरच्या ४ तारखेस लॉडच्या सभेतही ते बिल पास झालें, व फ्री-स्टेट परिपूर्ण रीतीने अस्तित्वात आल्यासारखे झाले. डिसेंबर ५ रोजी टिम हिली यास ब्रिटिश सरकारने आयलंडचा गव्हर्नर जनरल नेमले. फ्री-स्टेटमध्ये सामील न होण्याचा आपला निश्चय अल्स्टरने शेवटी पार पाडला, व ड्यूक ऑफ अंबरकॉर्न यांची उत्तर आयर्लंडचा गव्हर्नर म्हणून ब्रिटिश सरकारकडून नेमणूक करण्यांत आली. याप्रमाणे डिसेंबर १९२१ च्या तहानुसार सर्व गोष्टींची व्यवस्था लागली, आणि १२ डिसेंबर १९२२ रोजी फ्री-स्टेटच्या सेनेटची पहिली बैठक होऊन फ्री-स्टेटच्या राज्यघटनेचा अंमल विधिपूर्वक सुरू झाला. १९२२ सालाचा अस्त झाला त्यावेळची परिस्थिति अशी हाता. आयलंडने या वर्षाचा आढावा काढला तर जमेच्या बाजूस फक्त फ्रा