पान:डी व्हँलरा.pdf/133

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रक्ताने माखलेलें वर्ष १२५ येण्याविषयींच्या सर्व आशा खोट्या होत्या. आज आठ दहा महिने त्याचा सारखा पाडाव होत होता हे खरे, व त्याच्या जवळ आतां फार मोठे सैन्य उरले नव्हते हेही खरे; पण जे मूठभर लोक उरले त्यांच्या सहाय्याने आपल्या ध्येयासाठी लढत राहण्याचा डी व्हॅलेराचा निश्चय कायम होता. डी व्हॅलेरा निराश झाला अशा बातम्या जे लोक उठवीत होते व अशा बातम्यांवर जे लोक विश्वास ठेवीत. होते त्यांना डी व्हलेराचे अंतःकरण कळले नव्हते असेच म्हटले पाहिजे, निराशाजनक परिस्थितीने फाटण्यासारख्या कच्च्या दिलाचा डी व्हॅलेरा नव्हता. तथापि यावेळीं दैव डी व्हॅलेराला प्रतिकूल होते हैं खचित. त्याच्या सैन्याला ठिकठिकाणी माघार घ्यावी लागत होती, व त्याच्या पक्षाचे जे लोक फ्री-स्टेटवाल्यांच्या हातीं सांपडत त्यांना भयंकर कडक शिक्षा ठोठावण्यात येत होत्या. १८ नोव्हेंबरला तर डी व्हॅलेराच्या पक्षांतील चार लोकांना डब्लिन शहरीं फांशी देण्यात आले व त्या प्रकाराविषयीं फ्रीस्टेटच्या पार्लमेंटमध्ये बोलतांना कॉसग्रेव्हने असे स्पष्ट सांगितले, की ६६ लोकांचे प्राण घेण्यासाठी जे लोक हातांत हत्यारे घेऊन फिरतात त्यांना त्यांचेही प्राण सुरक्षित नाहींत ही गोष्ट पुरती पटवून दिलीच पाहिजे. याच सुमारास डी व्हॅलेराचा केवळ उजवा हात असा जो अस्किन चाइल्डर्स तो फ्री-स्टेट सरकारच्या हातीं सांपडला. त्याची लष्करी कोर्टापुढे झटपट चवकशी करण्यांत आली, व २४ नोव्हेंबर रोजी सकाळी त्याचा शिरच्छेद करण्यांत आला. | चाइल्डर्सचा अशा रीतीने अंत झाल्यामुळे डी व्हॅलेराचा पक्ष आता नामशेष होण्याच्या पंथास लागणार असे लोकांना वाटलें. प्रजासत्तावाल्यांचा फ्री-स्टेटशी झगडा सुरू झाल्यापासून डी व्हॅलेरास चाइल्डर्स ची कल्पनातीत मदत झाली होती. प्रजासत्तेविषयींची डी व्हॅलेराची निस्सीम भक्ति त्याच्या अंगीं पुरी मुरलेली होती, व डी व्हॅलेराच्या मनाची व अंतःकरणाची ठेवण त्याला इतक्या उत्तम रीतीने समजली