पान:डी व्हँलरा.pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२४ डी व्हलेरा पडल्यामुळे आतां फ्री-स्टेट विलयाला जाते की काय, अशी भीति लोकांना वाटू लागली. पण तसे कांहीं झालें नाहीं. ता. ९ सप्टेंबर रोजी फ्री-स्टेटच्या पार्लमेंटची जी बैठक झाली तीमध्ये वुइल्यम कॉसग्रेव्ह यांची अध्यक्ष‘पदावर निवड करण्यांत आली, व फ्री-स्टेटचे काम सुरळीत चालू झालें. उलट डी व्हॅलेराच्या सैन्याची रोजच्या रोज अधिकाधिक दुर्दशा होऊ लागली. आज क्लोनोमल येथें तर उद्यां ब्लार्ने येथे व परवां मॅकूम येथे अशा प्रकारे त्याला आपलें सैन्य सारखे हलवावें लागू लागले. द-याखो-यांच्या आश्रयाने आपली छावणी ठेवून फ्री-स्टेटशी गनिमी लढाई करण्यापलीकडे त्याला कांहीं करता येईना. ता. २३ ऑगस्टरोजी ‘मान पोष्ट' पत्राच्या कॉर्क येथील बातमीदाराने अशी बातमी प्रसिद्ध केली, की लढाई करून प्रजासत्ता स्थापन करण्याचा आपला प्रयत्न फसला असे डी व्हॅलेराने कबूल केले असून तो आपल्या लोकांना शस्त्रे खाली ठेवण्याचा व मग कायदेशीर उपायांनी प्रजासत्तेच्या स्थापनेसाठी खटपट करण्याचा उपदेश करणार आहे. ता. १३ सप्टेंबराला तर अशीही बातमी आला की डी व्हॅलेराने फ्री-स्टेटचा सेनापति मुल्काही याची गांठ घेतला, १ मुल्काहीने त्यास स्पष्ट वजावले, की प्रजासत्तावाल्यांनी हत्यारे खाली ठेवल्याखेरीज शांतता होणे शक्य नाही. माफी मिळण्याची आशा दिसल्यास डी व्हॅलेराचे लोक त्याला सोडून फ्री-स्टेटच्या बाजूला यताल असे वाटून ता. ४ आक्टोबर रोजी फ्री-स्टेटने एक जाहिरनामा प्रति केला. त्या जाहिरनाम्यांत असे म्हटले होते, की पुष्कळसे लोक केवळ दिशाभूल होऊन डी व्हॅलेरास जाऊन मिळाले आहेत हे सरकारला माहीत आहे, व अशा लोकांना आपली चूक सुधारण्याची संधि द्यावयाच्या हेतूने सरकारने असे ठरविले आहे, की जे बंडवाले अजून बंडांतून आपले अंग काढून घेतील त्यांना पूर्ण माफी मिळेल. पण डी व्हॅलेराविषयींच्या या सान्या बातम्या व त्याचा पक्ष शरण