पान:डी व्हँलरा.pdf/131

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रक्ताने माखलेले वर्ष १२३ कॉलिन्स यांचे मृत्यू हीच ती संकटें होत, ता. ११ ऑगस्ट रोजी आर्थर ग्रिफिथ एका इस्पितळांत कांहीं कामासाठी गेला असतांना जिन्याच्या पाय-या उतरण्याच्या वेळीं सैल झालेले बुटाचे बंद बांधण्यासाठी खालीं वांकला तोंच त्याच्या छातीत कळ आली व तो तसाच खाली पडला. एका मिनिटानंतर तो शुद्धीवर आला. पण ती शुद्ध पुरी मिनिटभरदखल टिकली नाहीं व तो गतप्राण झाला. ग्रिफिथच्या या आकास्मक मृत्यूने फ्री-स्टेटच्या इमारतीला धरणीकंपाचा धक्का बसल्यासारखेच झालं. आणि धरणीकंपाच्या वेळीं एक धक्का संपतो न संपतो तोच दुसरा धक्का बसावा त्याप्रमाणेच ग्रिफिथच्या मृत्यूविषयींच्या शोकाचा आवेग ओसरला नाहीं तोंच फ्री-स्टेटवाल्यांवर मिशेल कॉलिन्सच्या मृत्यूची बातमी ऐकण्याचे दुर्दैव ओढवलें. ता. २३ ऑगस्ट रोजी सकाळी कॉलिन्स आपल्या सैन्याची पाहणी करण्यासाठी बँडन येथे गला होता. तेथून संध्याकाळी परत येत असतांना एका अडचणीच्या जागी दोनों प्रजासत्ताक शिपायांनी त्याची मोटार अडविली. कॉलिन्स बरोबर अवघे वीस लोक होते. जोराची झटापट सुरू झाली. कॉलिन्स स्वतः मोटार खाली उतरून बंदूक चालवू लागला. एक तासभर गोळीबार चालला होता. शेवटी प्रजासत्तावाले पळू लागले व कॉलिन्सची बाजू यशस्वी होत आली. पण दुर्दैवाने तितक्यांतच कॉलिन्सच्या मस्तकांत एक गोळी शिरली व तो मृत होऊन पडला. कॉलिन्सच्या मरणाने केवळ त्याच्या पक्षालाच नव्हे तर साच्या राष्ट्राला अपरिमित दुःख वाटले. त्याच्या मृत्यूने फ्री-स्टेटची जी हानि झाली तिला तर सीमाच नव्हती. ग्रिफिथ व कॉलिन्स हे फ्री-स्टेटचे पंचप्राण होते. ग्रिफिथचे बुद्धिबल आणि मिशेल कॉलिन्सचे बाहुबल यांवरच फ्री-स्टेटची सारी इमारत उभी राहिली होती. अवघ्या दहा बारा दिवसांच्या अंतराने त्या इमारतीचे दोन्ही आधारस्तंभ कोसळून