पान:डी व्हँलरा.pdf/130

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२२ डी व्हॅलेरा पक्षाचे लोक ग्रेशम हॉटेलच्या आश्रयाने लढत होते. पण त्यांचा अखेरपर्यंत टिकाव लागणे शक्य नव्हते. शेवटीं जुलई ५ ला ते ठाणे सर्वस्वी फ्री-स्टेटवाल्यांच्या ताब्यात गेले. प्रजासत्तावाल्यांचे फार लोक कामी आले. कॅथल ब्रूघा व बार्टन हे त्यांचे दोन पुढारी शत्रूच्या हातीं सांपडले. मोठ्या शिकस्तीने डी व्हॅलेरा ऑस्टिन स्टॅक यासह ग्रेशम हॉटेलमधून सुरक्षितपणे निसटला. पुढे कॅथल ब्रूघा मरण पावला, व बार्टन फ्री स्टेटवाल्यांच्या तुरुंगांतून पळून येऊन पुन्हां डी व्हॅलेराला मिळाला. डब्लिन शहर सोडून द्यावे लागल्यानंतर डी व्हॅलेरा खालीं नैऋत्येकडे सरकला व कॉक परगण्यांत त्याने आपल्या सैन्याची जमवाजमव केली. मिशेल कॉलिन्स हा कार्क परगण्याचा रहिवाशी होता व फ्री-स्टेटच्या सैन्याची हुकमत त्याच्या हाती होती. तेव्हां कॉक परगण्यांतील लढाईत डी व्हॅलेरा व कॉलिन्स, यांची गांठ पडणार, व आयर्लंडचे जे दोन पुढारी कांहीं काळापूर्वी खांद्याला खांदा भिडवून ब्रिटिशांशी झगडले तेच दोघे आतां समरांगणावर समोरासमोर उभे राहणार अशी स्पष्ट चिन्हें दिसू लागली. कॉक परगण्यांतही डी व्हॅलेराच्या सैन्याचा पाय नीटसा कोठेच रुजेना. टिप्परारी, कॅशेल, किल्मलॉक, चालव्हिल वगैरे ठिकाणी फ्री-स्टेट सैन्याने त्यांचा चांगलाच पाडाव केला, ब्रूरी येथूनही त्यांना पळावे लागले, व शेवटीं बटेट, मॅलो व फर्माय या तीन गांवांचा त्रिकोण साधून त्यांत डी व्हॅलेराने आपले सारे लोक एकवटले. या सुमारास अशीही एक गप्प उठली, की पैशांची मदत मिळविण्यासाठी डी व्हॅलेरा अमेरिकेला निघून गेला आहे. परंतु ती गप्प खोटी असल्याचे लवकरच सिद्ध झालें, व क्लोनोमल व वॉटरफोर्ड येथे डी व्हॅलेरा आपल्या सैन्यावर आहे याबद्दल शंका उरली नाहीं. | डी व्हॅलेराच्या पक्षाची याप्रमाणे सारखी पिछेहाट होत असतांना फ्री-स्टेट पक्षावरही दोन फार मोठी संकटें गुदरली. ग्रिफिथ व