पान:डी व्हँलरा.pdf/129

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रक्ताने माखलेलें वर्ष १२१ आहेत असे फ्री-स्टेट सरकारने जाहीर केले, व त्यांचा पुरा बीमोड करण्याचेही त्या सरकारने ठरविले. १५ एप्रिल रोजी प्रजासत्ताकवाल्यांनी डब्लिनच्या न्यायकचेन्या काबीज करून ठेवल्या होत्या, व अजूनही त्याच कचेन्यांत ठाणे देऊन ते बसलेले होते. त्यांच्या या ठाण्यांवर इल्ला करून त्यांना तेथून हुसकावून लावावयाचा फ्री-स्टेटने आतां बेत केला. या बेताप्रमाणे सैन्याला हुकुम सोडण्यात आले. ता. ३० जून रोजी पहाटे फ्री-स्टेटच्या सैन्याने डब्लिनच्या न्यायकचेन्यांवर अचानक छापा घातला. न्यायकचेन्यांच्या इमारती सुरुंगाने एकदम उडवून देण्यांत आल्या. दोन्ही सैन्यांची विलक्षण झटापट झाली. शेवटी ठाणे शत्रूच्या स्वाधीन करून बाहेर पडणे प्रजासत्ताक सैन्याला भाग पडले. डी व्हॅलेरानें आपलें सारें सैन्य कचेरीच्या बाहेर शहरांत पसरविले,व एक जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्या जाहिरनाम्यांत म्हटले होते, की, * अपल्या प्राणांसाठी लढण्याचा प्रसंग प्रजासत्तेवर आला आहे. देशबांधवांनो, या वेळी प्रजासत्तेच्या रक्षणासाठीं धांव घ्या. नेहमीच्याच शत्रूशी झगडावयाचे आहे. तो शत्रू म्हणजे इंग्लंड. चर्चिलने चाबूक कडाडदिशीं वाजविला व हुकूम केला म्हणूनच फ्री-स्टेटने न्यायकचेन्यांवर हल्ला केला. चर्चिलच्या हुकमतीने वागणा-या या फ्रीस्टेटवाल्यांचा धिक्कार असो ! प्राणांत प्राण आहे तोपर्यंत प्रजासत्तेचे रक्षण करण्याचा प्रजासत्तावाल्यांचा कृतनिश्चय आहे !" न्यायकचेन्यांतून निघून जावे लागल्यानंतर डी व्हॅलेराने डब्लिन शहरांतील रॉकव्हिल नांवाच्या रस्त्याच्या आसपास व तेथील कांहीं हॉटेलांत आपल्या सान्या सैन्याचे एकीकरण करून ठाणे दिलें, व भोंवतीं ताबडतोब तटबंदी केली. पण ता.३ जुउई रोजी फ्री-स्टेटच्या सैन्याने त्याही ठाण्यावर हल्ला चढविला. एक दिवसभर सारखी लढाईची धुमश्चक्री चालली होती. फ्री-स्टेटच्या सैन्याची सारखी चढाई चालू होती. चारी बाजूंनी होणारा आगीचा वर्षाव अंगावर घेत प्रजासत्ताक