पान:डी व्हँलरा.pdf/128

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१२० डी व्हॅलेरा घेऊन त्यास विचारले. तेव्हां त्याने सांगितले, की “ एखाद्या माणसाचा प्राण घेणे हा भयंकर अपराध होय. पण या अपराधाचा बळी एखादा दीनदुबळा, गरीब शेतकरी असला म्हणजे त्याची उग्रता कमी, आणि एखादा प्रसिद्ध, बडा अधिकारी मारला गेला म्हणजे तो अपराध अधिक भयंकर असे थोडेच आहे ? वुइलसनला कोणीं मारले व कां मारले ते मला माहीत नाहीं. पण मला एक गोष्ट माहीत आहे; ती ही कीं, सरकारने जुलुमाचे व अत्याचाराचे धोरण चालू ठेवले म्हणजे प्रजेमध्ये एक प्रकारची हिंसकवृत्तीच उत्पन्न होते. सरकारच्या साम्राज्यतृष्णमुळेच असले भयंकर अत्याचार प्रतिकाररूपाने होत असले पाहिजेत, हेच मत मला मान्य आहे. या अत्याचारापासून जर कोणता बोध घेण्यासारखा असेल तर तो हाच, की न्यायनीतीचा पाया असेल तरच दोन राष्ट्रांमध्ये परस्पर सख्य किंवा एखाद्या देशांत अंतःस्थ शांतता राहणे शक्य आहे. व्हर्सेलीस येथे तहासाठी जमलेल्या राष्ट्रांनी न्यायनीतीची जरा चाड बाळगली असती तर जगाला शांततेचा लाभ झाला असता. तसेच गतवर्षीच्या डिसेंबरमध्ये आयर्लंडच्या प्रतिनिधींशी तहाची चर्चा करतांना ब्रिटिश मुत्सद्यांनी न्यायनीतीची थोडी तरी चाड दाखविली असती तर आज हे दोन देश हातात हात घालून सुखाने नांदतांना दिसले असते. न्यायनीतीविषयींच्या प्रेमाने प्रेरित होऊन इंग्रज व आयरिश एके ठिकाणी जमले तर या दोन देशांतील प्रश्नांचा आठ दिवसांत निकाल लागेल, आणि आयर्लंडचा अंतःस्थ प्रश्न तर चुटकीसरसा सुटेल. परंतु सारे अत्याचार संपावेत आणि चिरकालिक शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी प्रथम सर्वांनी निर्भयपणे सत्याचा व न्यायाचा आग्रह धरला पाहिजे ! निवडणुकीच्या निकालानंतर फ्री-स्टेटवर निकराचे हल्ले चढविण्याचे प्रजासत्ताकवाल्यांनी ठरविले, त्याप्रमाणेच प्रजसत्ताक सैनिक हे बंडखोर