पान:डी व्हँलरा.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रक्ताने माखलेले वर्ष ११९ असल्याचे सिद्ध झाले. आतां डेल आयरिनच्या द्वारे आपले कार्य चाळं ठेवण्याची डी व्हॅलेरास आशाच उरली नाहीं. | प्रजासत्तेचे आपले ध्येय कायम ठेवण्यासाठी फ्री-स्टेटचे राज्य ढासळून पाडण्याची खटपट करण्याशिवाय आतां डी व्हॅलेरास गत्यंतर नव्हते. समेटामुळे किंचित् शमलेल्या झटापटीलाच पुन्हां चलन देणे आतां प्राप्त होते. फ्री-स्टेटशीं विरोध करण्यांत आपल्या देशबांधवांच्याच प्राणांची व वित्ताची हानि करावी लागणार हे डी व्हॅलेरास कळत होते, फ्री-स्टट हाणून पाडावयाचे म्हणजे कॉलिन्स, ग्रिफिथप्रभृति ज्या प्रिय संवगड्यांशीं इतकी वर्षे आपण मोठ्या प्रेमाने सहकार्य केलें त्यांच्यावरच तरवार उगारावी लागणार हे पाहून डी व्हॅलेराच्या अंतःकरणाला पीळ पडत होता. या यादवीमध्ये देशाची नासधूस होईल हे पाहून देशभक्त डी व्हॅलेराला हळहळ वाटत होती. पण डोळे घट्ट मिटून हे सर्व करण्यास त्याने आपल्या मनाची तयारी केली. आणि ती कां तर प्रजासत्तेच्या स्थापनेतच आपल्या मायभूमीचे खरे वैभव आहे, आणि ते स्थापण्यासाठी आज कांहीही करावे लागले तरी त्यामुळे अखेर देशाचे कल्याणच होईल अशी त्याची खात्री होती म्हणून. निवडणुकीचे निकाल होऊन समेट मोडला गेल्याबरोबर प्रजासत्तावाले व फ्री-स्टेटाले यांच्यांत पूर्वीप्रमाणे सामना सुरू झाला. याच सुमारास ता. २२ जून रोजी इंग्लंडचे सेनापति सर हेनरी बुइलसन यांचा लंडन शहरीं त्यांच्या घराबाहेर खून करण्यांत आला. त्या खुनाच्या आरोपावरून दोन आयरिश तरुणांना पकडण्यांत आले, व तो खून प्रजासत्ताक पक्षाच्याच चिथावणीवरून झाला असा जिकडे तिकडे गवगवा झाला. वुइलसनच्या खुनाचा व प्रजासत्ताक पक्षाचा संबंध जोडप्याचा कांहीं लोक प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल तुमचे काय म्हणणे आहे, असे कांहीं वृत्तपत्रकारांनी डी व्हॅलेराची मुलाखत