पान:डी व्हँलरा.pdf/126

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११८ डी व्हॅलेरा पण ज्या मंडळांत डी व्हॅलेरा होता त्या मंडळापुढे चर्चिलसाहेबांच्या या धमकीचा टिकाव लागणे शक्य नव्हते. उलट चर्चिलच्या या उद्गारांबद्दल एका वृत्तपत्राच्या बातमीदाराने डी व्हॅलेराची मुलाखत घेतली तेव्हा त्याने ठासून सांगितले, की ** चर्चिलच्या धमकावणीला आम्ही भीक घालीत नाहीं. आम्हांला वाटेल त्या प्रकारची घटना आम्ही तयार करू. आयरिश लोकांनी अमुक प्रकारची घटना करावी किंवा करूं नये असें चोंबडेपणाने सांगण्याचा इंग्रजांना काय अधिकार आहे ? परंतु आयर्लंडच्या दुर्दैवाची गोष्ट ही, की ज्या समेटाने ब्रिटिश मुत्सद्यांना विषाद वाटत होता व आयरिश लोकांना आनंद झाला होता, तो समेट जून महिन्यांत निवडणुकी सुरू होईपर्यंतच टिकला. ता. २ जून रोजी उमेदवारांच्या यादींत ६६ तहानुकूल उमेदवार व ५९ तहप्रतिकूल उमेदवार दिसून आले. पुढे ता. १० रोजीची परिस्थिति अशी होती, की निवडणुकीत तहानुकूल लोकांचे मताधिक्य होण्याचाच ज्यास्त संभव दिसत होता. शेवटी १६ जून हा निवडणुकीचा दिवस उगवला तेव्हां प्रकरण हातघाईवर आले. रिलगो नांवाच्या भागांत निवडणुकीच्या वेळी प्रजासत्ताक लोकांनी दंगा केला, निवडणूक चालविणा-या अधिकाव्यांच्या कामांत अडथळे उत्पन्न केले, आणि मतपत्रिकाही जाळून टाकल्या. इतकेच नव्हे तर, कांहीं तहानुकूल मतदारांनाही त्यांनी पकडून पळवून नेले. शेवटी निवडणुकीचा निकाल जाहीर झाला तेव्हां तो सर्वस्वी तहाला अनुकूल असल्याचे दिसून आले. एकंदर १२० यशस्वी उमेदवारांपैकी फक्त ३४ प्रजासत्ताक पक्षाचे होते, आणि एकंदर मतांचा हिशोब पाहिला तर तहानुकूल पक्षाला ७२२८५ मते पडली असून प्रजासत्ताक पक्षाला फक्त १०९२१ च मते मिळाली होती. या निवडणुकीमुळे समेटाचा शेवट झाला, डी व्हॅलेरा पुन्हां डेल आयरिनबाहेर निघाला, व ग्रिफिथ-कॉलिन्सच्या पक्षाला देशाचा पाठिंबा