पान:डी व्हँलरा.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रक्ताने माखलेलें वर्ष ११७ आपल्या राष्ट्राची अब्रू जाते की काय अशी भीति उत्पन्न झाली होती; पण आज शेवटीं सुबुद्धीचा व शांततेचा विजय झाला आहे !" डी व्हॅलेराच्या या ठरावाला कॉलिन्सने स्वतः मोठे उत्साहाचे भाषण करून दुजोरा दिला व टाळ्यांच्या गजरांत एकमताने ठराव पास झाला. डी व्हॅलेरा, ग्रिफिथ, कॉलिन्स वगैरे पुढान्यांना या शुभसूचक समेटामुळे जितका आनंद झाला, तितकाच उत्तर आयलंडचे प्रधान सर जेम्स क्रेग व ब्रिटिश सरकार यांना तो समेट भीतिप्रद वाटला. ब्रिटिश सरकारला असल्या समेटानें भय वाटू लागावें यांत मोठेसे आश्चर्य नव्हते. भेदनीति चालवून दुस-यांचे देश कबजांत ठेवणाच्या ब्रिटिश सरकारला आयर्लंडमध्ये जितके पक्षोपपक्ष माजतील तितके पाहिजेच होते. डी व्हॅलेराचा व कॉलिन्सचा समेट होण्यापूर्वी समेटाचे गोडवे गाऊन ब्रिटिश सरकार सज्जनपणाचे नाटक करीत होते, परंतु तो खरोखरच घडून आलेला पाहून ब्रिटिश सरकारला बरे वाटले नाहीं. ब्रिटिश मुत्सद्यांना तर अशी धास्ती वाटू लागली, की कदाचित् डी व्हॅलेराच्या मताचे पुन्हां वर्चस्व होऊन आयलँड प्रस्तुतचा तह नामंजूर करून संपूर्ण स्वातंत्र्याची पुन्हा मागणी करील. त्या मुत्सद्यांची ही धास्ती अगदीच वेडेपणाची व खोटी होती असेही नव्हे. त्या वेळचा तो समेट चिरकालिक झाला असता तर खरोखरच ती धास्ती खरी ठरली असती. डी व्हॅलेराच्या हातीं डेल आयरिनची सूत्रे पुन्हा गेलेली पाहून ब्रिटिश पार्लमेंटचे सभासदही अस्वस्थ झाले व समेट मोडून टाकण्याच्या उद्देशाने पार्लमेंटमधील कांहीं वक्ते आपल्या भाषणांत आयलंडला धाक घालण्याचाही प्रयत्न करू लागले. आयर्लंडच्या राज्यघटनेचा मसुदा समेटाने निर्माण केलेल्या संयुक्त मंडळाकडून या वेळीं तयार होत होता. त्या मसुद्याला उद्देशून चर्चिलसाहेब पार्लमेंटमध्ये मोठ्या दिमाखाने असे म्हणाले, की “ हा मसुदा जर आम्हांला समाधानकारक वाटला नाहीं तर आम्ही तहाला मान्यता देणार नाहीं.