पान:डी व्हँलरा.pdf/124

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११६ डी व्हॅलेरा धमकावणाच्या लोकांत आणि रस्त्यावर वाटसरूंना गांठून लुबाडणा-या नीच दरोडेखोरांत काय अंतर आहे ? परंतु या धिक्काराचा व निषेधाचा कांहींच परिणाम होईना. प्रजासत्ताक सैन्याने आपला अत्याचारांचा क्रम चालूच ठेविला, व त्या अत्याचारांचा प्रतिकार करण्याकरितां फ्री-स्टेटच्या सैन्यालाही कठोरपणाने वागणे भाग पडत होते. शेवटी ही क्रियाप्रतिक्रियेची परंपरा चालावयाची तरी कोठपर्यंत असे ग्रिफिथ व कॉलिन्स यांस वाटू लागले. फ्री-स्टेट तात्पुरतें चालू झालें असले तरी त्याला कायमचे स्वरूप द्यावयासाठी किती तरी गोष्टी करावयाच्या होत्या. तहाच्या मसुद्यांत एक कलम असे होते, कीं फ्री-स्टेटचे पार्लमेंट अस्तित्वात आले, की प्रथम त्या पार्लमेंटने राज्यव्यवस्थेची तपशीलवार घटना तयार करावी व ती ब्रिटिश पार्लमेंटकडे पाठवावी. त्या घटनेला ब्रिटिश पार्लमेंटची संमत मिळाली म्हणजेच फ्री-स्टेटच्या राज्याला कायमचे स्वरूप यावयाचे होते. पण हे घटनेचे काम अजून तसेच पडले होते, व इतरही कित्येक महत्त्वाची कामें मागे राहिल होती. प्रजासत्तावाल्यांच्या अत्याचारांचा प्रतिकार करण्यांतच फ्री-स्टेटची सर्व शक्ति खर्च व्हावयास लागली तर राज्याला स्थिरता आणण्याचे खरें काम केव्हांच व्हावयाचें नाहीं अशी भीति ग्रिफिथ व कॉलिन्स यांना वाटू लागली, व त्यांनीं डी व्हॅलेराशीं समेट करण्याचे ठरविले. | ता. २० मे रोजी डी व्हॅलेरा व कॉलिन्स यांच्यामध्ये समेट झाल्याचे वर्तमान जाहीर झाले. या समेटान्वये असे ठरले, की निवडणुकी इतक्यांत न होतां १६ जून रोजी व्हाव्यात, तोपर्यंत कार्यकारी मंडळांत अध्यक्ष व प्रधान यांखेरीज तहाला अनुकूल पांच व प्रतिकूल चार सभासद असावेत, व या संयुक्तमंडळानेच राज्यघटनेचा मसुदा तयार करावा. या सुमारास डेल आयरिनची एक परिषद भरले त्यावेळी २००० सभासदांपुढे डी व्हॅलेराने ही समेटाची सूचना ठरावाच्या रूपाने पुढे मांडली. त्या वेळीं तो म्हणाला, '* गेले सहा महिने ।