पान:डी व्हँलरा.pdf/123

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रक्ताने माखलेलें वर्ष ११५ हल्ला केला, व मुख्य वक्ता गॅव्हन डफी यास फरफरां ओढीत नेले. असले प्रकार प्रत्येक सभेत व्हावयास लागले. याच सुमारास एका वृत्तपत्राच्या प्रतिनिधीशी झालेल्या मुलाखतींत डी व्हॅलेराने स्वच्छ सांगितलें, कीं * सध्या ज्या प्रकारच्या निवडणुकी होणार आहेत त्यामुळे तह कायम होईल. याकरितां त्या निवडणुकी हाणून पाडण्याचा शेवटचा उपाय म्हणून प्रजासत्तावाल्या सैनिकांना असल्या गोष्टी करणे भाग आहे. कांहीही करून निवडणुकी हाणून पाडण्याचे धोरण डी व्हॅलेराने आपल्या पक्षापुढे ठेवल्यामुळे रोज सभा उधळण्यांत येऊ लागल्या, लहानसहान मारामाच्या ठिकठिकाणी होऊ लागल्या, आणि लुटालूट च जाळपोळ येथपर्यंत देखील दोन्ही पक्षांची मजल गेली. राजरोस युद्ध सुरू झाल्यासारखे दिसू लागले. युद्धाच्या त्या देखाव्यांत जर कांहीं कमतरता असेल तर तीही ता. १५ एप्रिल रोजी भरून निघाली. त्या दिवशी डब्लिन शहरांतील न्यायकचेन्यांवर प्रजासत्ताक सैन्याने भर मध्यरात्री एकदम छापा घातला, इमारती काबीज केल्या, व भोंवतालीं तटबंदी वगैरे करून आपले कायमचे ठाणे त्या ठिकाणी बसविलें. ईस्टरच्या सणाच्या दिवशीं आयर्लंडच्या तरुण पिढीला उद्देशून डी व्हॅलेराने एक संदेश जाहीर केला. १९१६ साली डब्लिन शहरांत झालेल्या बंडाची आठवण करून देऊन डी व्हॅलेराने त्या संदेशांत म्हटले होते, ** आतां पल्ला थोडा राहिला आहे. मुक्काम डोळ्यांना दिसू लागला आहे. पुढे व्हा. तुम्ही हात पुढे केलेत कीं आयलंड तुमच्या हातांत येईल. उठा, हात पुढे करा ! ग्रिफिथ, कालिन्स वगैरे मंडळी डी व्हॅलेराच्या अनुयायांच्या वर्तनाचा धिक्कार करीत होती. १८ मे रोजी भरलेल्या डेल आयरिनच्या सभेत ग्रिफिथ म्हणाला, * डी व्हॅलेराच्या लोकांची पाशवी वृत्ति कळसाला पोचल्यासारखी दिसते. प्रजासत्तेचे व सुराज्याचे हे लोक शत्रू होत. लोकांवर पिस्तुलें रोखून ' तुमची मते आम्हांस द्या नाहीं तर प्राण घेतों' असे