पान:डी व्हँलरा.pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११४ डी व्हॅलेरा खरोखरच दोन पक्ष झाले होते. कांहीं सैनिक फ्री-स्टेटला धनी समजून नोकरी करण्यास तयार होते. पण कांहीं असे होते, की ते फ्री-स्टेटचा अधिकार ओळखीत नव्हते, व डी व्हॅलेराच्या आज्ञेप्रमाणेच चालण्याची त्यांची इच्छा होती. हा पक्षभेद रोजच्या रोज वाढत जाऊन शेवटी कळसास पोंचला, व ता. २९ मार्च १९२२ रोजी फ्री-स्टेटच्या विरुद्ध असलेल्या सैनिकांच्या कार्यकारी मंडळाने असे स्पष्ट ठरविलें, की यापुढे फ्री-स्टेटच्या सेनापतींचे हुकूम पाळावयाचे नाहींत. डी व्हॅलेराच्या बाजूचे सैन्य आणि फ्री-स्टेटचे सैन्य यांमध्ये आतां उघड युद्ध सुरू होणार असाच याचा अर्थ होता, व त्याप्रमाणे ते लवकरच सुरू झाले. | फ्री-स्टेटचे सैन्य व प्रजासत्ताक सैन्य यांची पहिली चकमक २७ मार्चच्या सुमारास झाली. डॉनीगल परगण्यांतील एका खेडेगांवांत प्रजासत्ताक सैन्यांतील लोक मोटारगाड्यांतून मध्यरात्रीं अकस्मात् गेले. त्या गांवीं फ्री-स्टेटच्या सैन्याची छावणी ज्या ठिकाणीं होती त्या ठिकाणावर मारा करण्यास सोयीचीं पडणारी सर्व घरे त्यांनी ताब्यांत घेतलीं, व गोळीबार सुरू केला. फ्री-स्टेटच्या सैन्यानेही उलट मारा सुरू केला. याप्रमाणे तीन तास बंदुकांच्या फेरी झडल्यावर प्रजासत्तावाले निघून गेले. या दिवसापासून असल्या चकमकी म्हणजे दैनिक क्रम होऊन बसला. डी व्हॅलेरा तहाविरुद्ध लोकमत तयार करीतच होता. ता. ७ एप्रिल रोजी डनलोघेर येथील सभेत बोलतांना तर त्याने तहाविरुद्ध फारच कडक भाषण केले व शेवटीं म्हटले, “ या तहाच्या तुम्हीं फाडून चिटोप्या करून टाकल्या पाहिजेत. तात्पुरत्या स्थापन झालेल्या या सरकारचे हुकूमच तुम्ही धाब्यावर बसवलेत म्हणजे मग हे सरकार कसे आपले काम चालवते पाहूं ! पुढे ता.१० एप्रिल रोजी तहाला अनुकूल असलेल्या लोकांची तुलामूर येथे एक जंगी सभा भरली असतांना प्रजासत्तावाल्या लोकांनी गोंधळ माजवून प्लॅटफॉर्मवर