पान:डी व्हँलरा.pdf/121

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रक्ताने माखलेलें वर्ष ११३ यांनी असे स्पष्ट बोलून दाखविले, की १९२० सालच्या कायद्याप्रमाणे अल्स्टरच्या ज्या सरहद्दी ठरलेल्या आहेत त्यांत एका रेघेचा देखील फरक होऊ देण्यास आम्हीं तयार नाही. यावरून सरहद्दीच्या प्रश्नाबद्दल आपल्याला अल्स्टरशी चांगलाच झगडा करावा लागणार असें ग्रिफिथ व कॉलिन्स यांनी ओळखलें. डी व्हॅलेराच्या विरोधांत या विरोधाची आणखी भर पडली. एकीकडे डी व्हॅलेराच्या संपूर्ण स्वातंत्र्याच्या आग्रहाचा खडक व दुसरीकडे अल्स्टरवाल्यांच्या दुष्टाव्याचा खडक अशा बिकट स्थितींतून फ्री-स्टेटचे गलबत सुरक्षित पणे हांकारण्याचे कठीण काम ग्रिफ़िथ व कॉलिन्स यांस करावयाचे होते. | १४ जानेवारी १९२२ रोजी तहान्वये अस्तित्वांत आलेल्या पार्लमेंटची डब्लिन शहरीं बैठक झाली, तारीख १७ रोजी राजेसाहेबांनी आयलंडच्या व्हाइसरॉयामार्फत त्या पार्लमेंटला शुभाशीर्वादही पाठविले, आणि फ्री-स्टेटचे काम सुरू झाल्याचा बाह्य देखावा बहुतेक संपला. पण कांहीं झालें तरी फ्री-स्टेटचा गाडा नीट चालू न देण्याचा डी व्हॅलेराने निश्चय केला होता. डेल आयरेनच्या नव्या वर्षाच्या निवडणुकीची वेळ आतां आली होती. या संधीचा फायदा घेऊन निवडणुकीत आपल्या पक्षाचेच लोक निवडून आणावयाचे व मग तह भिरकावून देऊन, नुक्त्याच जन्मलेल्या फ्री-स्टेटच्या गळ्याला नख लावून ते नष्ट करावयाचे असे डी व्हॅलेराने ठरविले व त्याप्रमाणे ताबड-- तोब तो कार्यालाही लागला. ता.१२ फेब्रुअरी रोजी डब्लिन येथे भरलेल्या एका प्रचंड सभेत त्याने विस्तृत भाषण करून आपल्या पक्षाचे समर्थन केलें, व फ्री-स्टेटचा धिक्कार करून पूर्वी प्रस्थापित झालेल्या प्रजासत्तेचा पाठपुरावा करणारे ठराव त्याने पास करून घेतले. ता. २० रोजी अशीच एक प्रचंड जाहीर सभा कोर्क शहरी झाली व त्या वेळच्या भाषणांत तर डी व्हॅलेराने असे प्रतिपादन केलें, कीं रिपब्लिकन सैन्य फ्री-स्टेटच्या विरुद्ध आहे. त्या सुमारास रिपब्लिकन सैन्यांत डी...८ ।