पान:डी व्हँलरा.pdf/120

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

११२ डी व्हॅलेरा ध्येय आहे, तेच डोळ्यांपुढे ठेवून मी आजपर्यंत वागलों, व तेच डोळ्यांपुढे ठेवून मी यापुढेही काम करणार' असे त्या मुलाखतींत डी व्हॅलेराने पुनः पुन्हां सांगितले. । - तहाच्या मोहाला बळी पडून भलत्या दिशेला झुकलेले लोकमत पुन्हा जागेवर आणण्याचे काम आतां डी व्हॅलेरास करावयाचे होते. हे काम अत्यंत बिकट होते. तथापि हेही खरें, की तह मंजूर करून स्वराज्याची स्थापना करण्यास पुढे झालेल्या मंडळीचे कामही कांहीं सोपे नव्हते. ग्रिफिथ व कॉलिन्स यांना अनेक विरोधांशीं टक्कर देऊन राज्याची उभारणी करावयाची होती. फ्री-स्टेट अस्तित्वात न यावें म्हणून खटपट करणारा एकटा डी व्हॅलेराचाच पक्ष होता असे नव्हे. भिन हेतूने पण फ्री-स्टेट टिकू न देण्याचेच काम करणारा आणखी एक पक्ष होता. तो पक्ष अल्स्टरवाल्यांचा होय. आयर्लंडचा उत्तर भाग म्हणजे अल्स्टर परगणा व दक्षिण भाग यांचा आज कित्येक दिवस वैरभाव चालत आलेला होता, व हा वैरभाव कायम राहून आपला पाय आयलंडमध्ये चिरकाल टिकावा या धोरणानेच ब्रिटिश मुत्सद्दी आजपर्यंत राजकारणांची सूत्रे हालवीत आले होते. १९२० सालच्या कायद्याने अल्स्टरचा राज्यकारभार वेगळा झालेला होता; आणि आतां जो तह झाला त्यानेही तो सवता सुभा नाहीसा होईलच असे निश्चयाने सांगतां येण्यासारखे नव्हते. तहांत असे एक कलम होते, की आयर्लंडला मिळणा-या फ्री-स्टेटमध्ये आपला राज्यकारभार सामील करण्याचे अल्स्टरनें कबूल केले तर बरेंच झाले, पण तसे न झाल्यास अल्स्टर व फ्री-स्टेट यांच्या परस्पर सरहद्दी ठरविण्यासाठी एक कमिशन नेमण्यात यावे. परंतु तह झाल्यानंतर लवकरच अशी चिन्हें दिसू लागली, की त्यांवरून अल्स्टरचा हा प्रश्न सामोपचाराने मिटणार नाहीं असे उघड होऊ लागले. तारीख १४ मार्च १९२२ रोजी झालेल्या अल्स्टर पार्लमेंटच्या बैठकीत तर अल्स्टरचे प्रधान सर जेम्स क्रेग