पान:डी व्हँलरा.pdf/119

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रक्ताने माखलेलें वर्ष १११ होईल. पण या टकेनंतर देखील डी व्हॅलेरा आपला आग्रह सोडीना. त्याचे म्हणणे एकच, की कार्यकारी मंडळ एक तहाला सर्वस्वी अनुकूल तरी किंवा सर्वस्वी प्रतिकूल तरी असले तरच ते कार्यक्षम होईल. शेवटीं डी व्हॅलेराचा राजीनामा मंजूर करण्यांत आला व त्याच्या राजीनाम्याबरोबरच त्याच्या कार्यकारी मंडळानेही राजीनामा दिला. । मग डेल आयरिनचा अध्यक्ष डी व्हॅलेरा असावा की ग्रिफिथ असावा असा प्रश्न निघून दोघांचीही नांवे निवडणुकीकरितां सुचविण्यात आली. ग्रिफिथचे नांव सुचवितांना कॉलिन्स म्हणाला “ एखाद्या गलबताला कप्तान नसावा त्याप्रमाणे आज आयरिश राष्ट्राची स्थिति झाली आहे. राष्ट्र भलतीकडे भडकून बेबंदशाही माजू नये यासाठी कधीही जें डळमळणार नाही असे सरकार आपण बनविले पाहिजे. निवडणुकीत ग्रिफिथ यशस्वी झाला. डी व्हॅलेराच्या पक्षाचा पराभव झाला, व डी व्हॅलेरा आपल्या अनुयायांसह सभास्थान सोडून गेला. याचा उघड अर्थ असाच होता, की ग्रिफिथ, कॉलिन्स प्रभृति मंडळींनी तहान्वये मिळणारे स्वराज्य चालविण्याची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली, आणि डी व्हॅलेराच्या पक्षाने त्या स्वराज्यापासून अलग राहण्याचे ठरविले. डी व्हॅलेरा आता पुढे काय करतों इकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले. आपल्या पक्षांतील मंडळींची सभा त्याने ओहिओ येथे भरविली. परंतु त्यांत काय चर्चा झाली व कोणत्या धोरणाचा निश्चय झाला हे लोकांना कळलें नाहीं. ओहिआ येथील बैठकीत काय ठरले हे जरी जाहीर झालें नाहीं तरी डी व्हॅलेराच्या धोरणाविषयीं तर्क करणें कांहीं फारसे अवघड नव्हते. आणि नंतर थोड्याच दिवसांनी * अंतरराष्ट्रीय वृत्तमंडळा चे प्रतिनिधि ओकोनेल यांनी डी व्हॅलेराची मुद्दाम गांठ घेऊन मुलाखतीची जी सविस्तर हकीगत प्रसिद्ध केली तिच्यावरून तर ते धोरण पुरतेच उघड झालें. * संपूर्ण स्वातंत्र्याचा उपभोग घेणारे आयरिश प्रजासत्ताक राज्य हेच आयरिश लोकांचे