पान:डी व्हँलरा.pdf/118

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

प्रकरण आठवें रक्ताने माखलेले वर्ष मागील प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे डेल आयरिनने ७ मतांच्या मताधिक्यानें तह मान्य केल्याबरोबर डी व्हॅलेराने सभेपुढे आपला राजीनामा सादर केला. राजीनामा देतांना त्याने सांगितले, की आजपर्यंत कार्यकारी मंडळांत जरी मतभेद होते तरी ते मतभेद विसरून सर्वांनी कार्य पुढे ढकलले होते. परंतु आता वेळ अशीच आली आहे, की कार्यकारी मंडळाची पुरती दोन शकले उडाल्यामुळे कोणत्या तरी एका पक्षाने खाली बसले पाहिजे. मात्र त्याने असेही बजावलें, कीं राजीनामा दिल्यानंतर आपण पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहणार व त्या निवडणुकीत यशस्वी झाल्यास तहाला राष्ट्राची संमति नाहीं असेच धरून चालणार. डी व्हॅलेराने राजीनामा द्यावा हे कॉलिन्स यास पसंत नव्हते. म्हणून त्याने अशी सूचना पुढे आणली, कीं दोन्ही पक्षांतील प्रतिनिधींची एक कमिटी नेमण्यात यावी म्हणजे त्यामुळे सार्वत्रिक सुरक्षितताही राहील व ब्रिटिशांपासून राज्याची सूत्रे हाती घेणेही सुकर होईल. परंतु डी व्हॅलेराला हा समेट इष्ट वाटला नाहीं. डेल आयरिन तहाला पूर्ण अनुकूल असेल तर तहाला अनुकूल असलेल्या माणसांचेच कार्यकारी मंडळ तिने निनडावे, नाहीं तर तहाला प्रतिकूल असलेल्या लोकांना निवडून सभेने आपली तहाविषयीची नापसंती दर्शवावी असा त्याने आग्रह धरला. या आग्रहावर कॉलिन्सने अशी टीका केली, कीं डी व्हॅलेरा लोकांना प्रिय असल्यामुळे त्याला व त्याच्या पक्षांतील लोकांना डेलचे सभासद कदाचित कार्यकारी मंडळासाठी निवडतील, व मग ज्या डेल आयरिननें क्षणपूर्वी तह मान्य केला तिनेच लगेच दुस-या क्षणीं तोच तह नामंजूर केल्यासारखे होऊन सान्या जगाच्या उपहासाला डेल आयरिन पात्र