पान:डी व्हँलरा.pdf/117

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह झाला पण सिंह गेला १०९ विसरलात ? येवढेच शब्द त्याने कसेबसे उच्चारले. पण ते उच्चारतांच त्याला आपल्या भावनांचा पूर आवरेनासा झाला. त्याने आपले डोळे. दोन्ही हातांनी घट्ट झांकून धरले, आणि तो हुंदके देऊ लागला. ते पाहताच सभास्थानी प्रतिनिधि म्हणून आलेल्या सर्व स्त्रियाही ढसढसां रडू लागल्या. दगडालाही पाझर फोडणारा तो देखावा होता.. आयर्लंडनें तह मिळविला पण सिंहासारखा पुढारी गमावला. पुढे घडून आलेल्या गोष्टींनीं डी व्हॅलेराचेच भविष्य खरे ठरलें. तह झाला तरी देशांतील अस्वस्थता संपली नाहीं. दंगेधोपे, जाळपोळ, अत्याचार यांची नवी परंपरा सुरू झाली. हा दुर्दैवी आयर्लंड देशा !