पान:डी व्हँलरा.pdf/116

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०८ डी व्हॅलेरा आली होती. पण पार्नेलने उत्तर दिलें, ६ असलें काम मला करावयास सांगण्याचा तुम्हांला कांहीं हक्क नाही. कारण राष्ट्राच्या प्रगतीला व महत्त्वाकांक्षला सीमा आखून देण्याचा कोणालाही अधिकार नाहीं ! 'पार्नेलचे हे शब्द डोळ्यांपुढे ठेवा. हा तह मान्य करणे म्हणजे आपल्या मायभूमीच्या प्रगतीला व स्वातंत्र्याला सीमा घालून देण्यासारखे आहे हे विसरू नका. पुन्हा एकवार तुम्हा सर्वांना प्रार्थना करतों, की हा तह तुम्ही मान्य करू नका. परंतु डी व्हॅलेराच्या पूर्ण वर्चस्वाचे दिवस संपविण्याची दैवाची लहर होती. आयर्लंडचे दुर्दिन संपले नव्हते. वादविवाद संपल्यानंतर जेव्हा मते घेण्यांत आली तेव्हां तहाला अनुकूल ६४ व प्रतिकूल ५७ अशी मते पडून अवघ्या ७ मतांच्या मताधिक्यानें तह मंजूर झाला.. तहाला मंजुरी मिळालेली पाहून डी व्हॅलेराच्या अंतःकरणांत दुःख, निराशा आणि त्वेष यांचे केवढे काहूर माजले असेल त्याची कल्पना करणे कठीण आहे. आपल्या सदुपदेशाला न जुमानतां आयर्लंडने आत्मघात करून घेतला हे पाहून त्याला दुःख वाटले असेल. आपल्या मायभूमीच्या स्वातंत्र्याचा या तहामुळे एकदां असा विक्रय झाल्यानंतर पुन्हा पूर्ण स्वातंत्र्याचे दिवस तिला कसले लाभणार अशी त्याला निराशा वाटली असेल. असला मानहानिकारक तह देशाने मान्य करावा म्हणून खटपट करणा-या भ्याड देशसेवकांचा त्याला त्वेष आला असेल, मनोविकारांचे ते काहूर त्याला अंतःकरणांतल्या अंतःकरणांत दडपून ठेवता येईना. तो एकदम आपल्या जागेवर उठून उभा राहिला व बोलू लागला. सारी सभा तो काय बोलतो या उत्सुकतेनें निःशब्द झाली. डी व्हॅलेराचे तोंड गोरेमोरे झाले होते, त्याचे सर्वांग कांपत होते, ऊर भरून आल्यामुळे तोंडातून शब्दही नीटसा फुटत नव्हता. ** दोस्तहो, गेली चार वर्षे आपण केवढे पराक्रम केले ते तुम्ही कसे