पान:डी व्हँलरा.pdf/115

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह झाला पण सिंह गेला १०७ तरी शब्दांचे अर्थ बदलत नाहींत. शब्दांना अर्थ असतो. असल्या महत्त्वाच्या तहाच्या मसुद्यांत जे शब्द असतात त्यांना तर अर्थ असतोच असतो. त्यांना अर्थ असतो म्हणूनच ते तहाच्या वेळी वापरले जातात. त्या शब्दांमागे वस्तुस्थितीचे खडक उभे असतात, आणि त्या खडकांकडे डोळेझांक करून चालत नाहीं. या तहाचा अर्थ जर कांहीं होत असेल तर तो हाच, कीं आयर्लंडचे मंत्री इंग्लंडच्या राजाचे मंत्री म्हणून नांदतील, आणि आयर्लंडचे सैन्य इंग्लंडच्या राजाचे सैन्य म्हणूनच नांदेल] (नाहीं । नाहीं.) ठीक आहे, काळपुरुष याचे प्रत्यंतर आणून देईल. पण ते प्रत्यंतर मिळण्याची संधिच उरणार नाही. कारण तुम्ही हा तहाचा मसुदा फकून द्याल अशी मला दृढ आशा आहे. उलट तुम्ही या तहाचा स्वीकार केला तर मी म्हणतो तसाच त्याचा अर्थ होतो की नाही हे योग्य वेळी कळून येईलच. माझे असे स्पष्ट मत आहे आणि माझे हे शब्द कोणी लिहून ठेवले तर ते मला पाहिजेच आहे-कीं, या तहाप्रमाणे आयर्लंडमधील कार्यकारी सत्तेचा उगम ब्रिटिश तक्तापासून होईल, त्या तक्ताच्या जोरावरच आयरिश मंत्री अधिकार चालवतील, आयर्लंडच्या शिपायांचा सर्वांत वरिष्ठ अधिकारी ब्रिटिश राजाच असेल, आणि या राजाशी एकनिष्ठ राहण्याची शपथ त्यांना द्यावी लागेल. असल्या या शिपायांना आपण ' आयर्लंडचे शिपाई' म्हणणार ! मी तुम्हांला उन्ही सांगतो, की आपल्या राष्ट्रीय आकांक्षांचा, राष्ट्रीय दज्र्याचा आणि परंपरेचा घात करणारा हा तह आहे. या तहाने शांतता कधीही मिळावयाची नाहीं. तहाच्या कागदावर तुम्ही आपल्या सह्या ठोकल्यात *हणून परंपरेचा प्रवाह तुमच्या हातून बदलेल अशी तुमची कल्पना आहे की काय ? पुढच्या पिढीच्या मार्गात अडथळे काय म्हणून उभे करतो ? असेच कांहीं करण्याचा आग्रह पूर्वी पार्नेल याला करण्यांत आला होता. त्या वेळी दिल्या जाणा-या सुधारणांनीं आयर्लंडचें कायमचे समाधान होईल असे म्हणण्याची त्याला गळ घालण्यांत