पान:डी व्हँलरा.pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०६ डी व्हॅलेरा अंतःस्थ कलह व अंतःस्थ प्रश्न यांचा समाधानकारक उलगडा करणे अशक्य झाले. या तहाचा तुम्ही स्वीकार केलात तर हे दुर्दैव संपणार नाहीं. ज्या भूमिकेवर आपण आज उभे आहोंत त्या भूमिकेशी हा तह सर्वस्वी विरुद्ध असल्यामुळेच मी त्याच्या विरुद्ध आहे. आयरिश लोकांनी प्रजासत्ता स्थापन केली आहे. त्या प्रजासत्तेला तुम्ही अनुकूल होता म्हणूनच लोकांनीं तुम्हांला निवडून डेल आयरेनमध्ये पाठविले. तेव्हा मी तर असेच म्हणतो, की प्रजासत्तेशी विसंगत अशी कोणतीहि गोष्ट करावयास डेल आयरेनला मुळीं अधिकारच नाही. या तहाला डेल आयरेनने संमति देणे सर्वस्वी बेकायदेशीर आहे. प्रजासत्तेचे ध्येय बदलण्याची सत्ता डेल आयरेनला नाहीं. लोकांना प्रजासत्ता नकोशी झाली असेल तर ती टाकून दुसरी राज्यव्यवस्था मान्य करण्याचा हक्क जनतेचा आहे. जनतेची मर्जी असेल तर ती तसे करील. पण डेल आयरेनला तसे करता येत नाहीं. | याहून अधिक बोलण्याची गरज नाहीं. सर्वसाधारण रीतीनें तहाविषयी मी आतांपर्यंत बोललो. पाहिजे असेल तर कलमवार तहाचा विचार करून त्याचा फोलपणा दाखविता येईल. पण साच्या कलमांची चर्चा खाजगी बैठकीत झालेलीच असल्यामुळे तिची आतां अवश्यकता नाहीं. हा तह आपल्या आजच्या दज्र्याला कमीपणा आणणारा आहे. आयरिश स्वातंत्र्याचा विक्रय करणारा हा तह आहे. या तहाने ब्रिटिश साम्राज्यांत आपण अडकणार आहोत. हा तह म्हणजे ब्रिटिश राजा आयर्लंडचा धनी होय अशी कबुली आहे. हा तह झाला तर आयर्लंडमधील साच्या सत्तेचा मूलाधार ब्रिटिश राजा ठरेल. आयर्लंडचे मंत्री त्या राजाचे मंत्री ठरतील, आणि आयर्लंडचे सैन्य म्हणजे त्या राजाचे सैन्य होऊन बसेल ! ( नाहीं ! नाहीं ! ) तुम्ही नाही म्हणून काय उपयोग ? हे शब्द तुम्हांला कडू वाटत असतील, पण तहांत जे शब्द आहेत त्यांचा अर्थ हाच होतो. शब्दांची तुम्हीं थट्टा केलीत