पान:डी व्हँलरा.pdf/113

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह झाला पण सिंह गेला १०५ तह घडवून आणून राष्ट्राचा भाग्योदय करण्याचे सामर्थ्य आज आपल्या मनगटांत आहे, आणि अशा वेळीं असला हा भिकार तह करण्याचे बेत चालले आहेत. असल्या तहाने राष्ट्रांत शांतता प्रस्थापित होण्याऐवजी लोकांत असंतोष मात्र माजेल. उद्यां ग्रिफिथ यांनी जॉर्ज राजाला बोलवून त्याच्या हस्ते आयर्लंडचे पार्लमेंट उघडण्याचा समारंभ करण्याचे ठरविले, तर राजा इकडे आल्याबरोबर लोक आपापल्या घरांवर काळी निशाणे उभी करतील, आणि डब्लिनच्या रस्त्यांना स्मशानभूमीची कळा येईल. अशा प्रकारांनी शांतता प्रस्थापित होईल असे तुम्हांला वाटते काय ? डब्लिनमध्ये राजा येतांच काळ्या, सुतकी निशाणांनी त्याचे स्वागत झाल्यावर इंग्लंडचे लोक काय म्हणतील ? राजाला आयलेडमध्ये आणण्याला आमची हरकत आहे असे नव्हे. आपल्याला हवा तसा, आपले सर्व हक्क मान्य करणारा तह झाला तर आपल्याला राजाला खुशाल इकडे आणतां येईल व त्याचे आपण आनंदाने स्वागत करू. ( नाहीं ! नाहीं ! ) कां ? नाहीं नाहीं कां म्हणतां ? राजाचे स्वागत करावयास कोणती हरकत आहे ? योग्य प्रकारचा तह झाला, तर इग्लंडच्याच काय फ्रान्सच्या किंवा स्पेनच्या राजाला देखील, किंवा वाटेल तर अमेरिकेच्या प्रेसिडेंटलासुद्धा आपण आणू शकू, आणि आयरिश लोक मनःपूर्वक त्याचे सस्वागत करतील. कारण त्या वेळीं जो राजा येईल तो आमचा धनी म्हणून न येतां एका स्वतंत्र राष्ट्राने निमंत्रित केलेला पाहुणा म्हणून येईल. या कारणासाठीच मी या तहाच्या विरुद्ध आहे. मूलभूत गोष्टीचीच साध्यता या तहाने झालेली नाहीं. आणि त्यामुळेच शांतता प्रस्थापित करण्याचे सामर्थ्य या तहाच्या अंगी असणे शक्य नाहीं. शंभर वर्षांपूर्वी आयर्लंड इंग्लंडशी जोडले गेल्यामुळे देशाची जो स्थिति झाली ती या तहाने कायमच ठेविली आहे. गेल्या सात शतकांत ज्या खडतर दुर्दैवाच्या भाराखालीं आयर्लंड वाकळे ते मुख्यतः हे, की ग्रेट ब्रिटनच्या परक्या अंमलाच्या जाचामुळे