३ १०४ डी व्हॅलेरा राज्य बेकायदेशीर आहे असे लोक म्हणतील की नाहीं पहा. लंडनला जे प्रतिनिधि गेले होते त्यांच्यावर वैयक्तिक टीकेचा हल्ला करण्याची सर्वात कमी इच्छा जर कोणाला असेल तर ती मला आहे. त्यांना किती बिकट काम करावयाचे होते हैं माझ्याइतके दुस-या कोणालाच माहीत नाही. एखाद्या जंगी सैन्याला किंवा आरमाराला देखील करणे दुर्घट अशी गोष्ट या प्रतिनिधींना करावयाची होती. मी डेलच्या सभेत पूर्वी असे बोलूनही दाखविले होते. या प्रतिनिधींनींनी जे केलें तें स्वदेशप्रीतीने प्रेरित होऊनच केले असेच मी अजूनही म्हणतों. | आयर्लंडचे व आयरिश लोकांचे कल्याण व्हावे असे इतरांना वाटते व मला वाटत नाहीं असें थोडेच आहे ? पण ज्या तहामुळे आयरिश लोकांना लाजेने खालीं माना घालाव्या लागतील असल्या तहावर सही करावयास माझा हात धजावत नाही. आपल्या देशाचा कारभार दुस-याचा हवाली करणा-या या तहाच्या खड्याला स्पर्श केल्याबद्दल सा-या जगाकडून स्वतःला हिणवून घेण्यापेक्षा पूर्वीसारखा झगडा चालूच राहिला तरी ते मला अधिक बरे वाटेल. वाटेल तर स्वतः पूर्ण स्वतंत्र राहून ब्रिटिश साम्राज्याशी केवळ बाह्य संबंध ठेवावा, किंवा वाटल्यास आपले स्वातंत्र्य सोडून साम्राज्यांत समाविष्ट व्हावे, या दोन्ही गोष्टी आज आयर्लंडला शक्य आहेत, पण आज सात शतकांचे युद्ध केल्यानंतर आतां साम्राज्यांत शिरण्याइतके आयरिश लोक शेळपट बनले आहेत असे तुम्हांला वाटते की काय? ज्या ब्रिटिश राजाच्या सैन्याशी आपण आजपर्यंत झगडलों व ज्या ब्रिटिश राजाच्या सैन्याने आपल्यावर राक्षसी जुलूम केले त्या राजाला आपला सार्वभौम धनी म्हणून कबूल करण्याइतके आपण बेहिमती झालो आहोत की काय? आणि वस्तुत: पंचम जॉर्जला नव्हे तर लॉइड जॉर्जला तुम्ही आपला धनी म्हणून पतकरीत आहांत. . सर्वात दुःखाची गोष्ट ही, की आपल्याला पाहिजे त्या प्रकारचा
पान:डी व्हँलरा.pdf/112
Appearance