पान:डी व्हँलरा.pdf/111

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह झाला पण सिंह गेला । १०३ दिपून गेले त्या या आमच्या पिढीने असल्या लाजिरवाण्या तहावर सह करावयाची की काय ? या असल्या स्वातंत्र्याला स्वातंत्र्य कोण म्हणेल ? मी तुरुंगति होतो तेव्हा आमचे वार्डर आम्हांला मोठ्या ऐटीने सांगत, की तुरुंगाच्या कोठडीतून वाटेल तेव्हां लगतच्या लहानशा दालनांत जावयाची मोकळीक तुम्हांला आहे. त्या मोकळिकीसारखेच हे स्वातंत्र्य आहे. तसंच तुरुंगांत असतांना एखादे वेळीं आम्हांला बागेत नेत व मग बागेतील झाडे, फुले, फळे व भोंवतालची टेकाडे पाहण्याची आम्हांस मोकळीक असे. पण असल्या स्वातंत्र्यासाठी आम्ही जेलरला आपले आत्मे विकले नाहींत. तुरुंगांतील त्या स्वातंत्र्यांत आणि या तहाने आयलंडला मिळणाच्या स्वातंत्र्यांत काय फरक आहे ? ज्या तहामुळे ब्रिटिशांना आयलंडवर सत्ता गाजवायला मिळेल त्या तहावर सही करण्यापेक्षां परमेश्वर आमच्या जुलमी राजांना नष्टप्राय करीपर्यंत गुलामगिरीत पडावयास आम्ही तयार आहोत. ( टाळ्या ). होमरूलचा कायदा किंवा तसलाच दुसरा एखादा कायदा ब्रिटिश सरकारने पास केला असता तर ते होमरूल घेऊ नका असा उपदेश मा कदाचित् केला नसता. मी म्हटलें असतें, ६ ठीक आहे, तुरुंगाचा आधकारी तुम्हांला कोठडींतुन लगतच्या दालनांत जावयाची परवानगी दत आहे. घ्या तिचा फायदा ! ! कारण होमरूल घेतल्याने त्या राज्यपद्धतीविषयींची मान्यता आपण कांहीं आपल्या सहीशिक्यानिशीं नोंदून ठेवीत नाहीं. या तहाने चिरकालिक शांततेचा पाया घातला जाईल अशा ढोंगीत्रणाच्या बोलण्याने जगाला फसवायचा तुमचा प्रयत्न असेल, तर असल्या प्रयत्नाने आयलंडचे खरें कल्याण होणार नाहीं हें लक्ष्यांत ठेवा, मात मिळेपर्यंत ग्रिफिथ व कॉलिन्स यांनी या तहाप्रमाणे डब्लिन हरा तात्पुरती राज्यव्यवस्था सुरू केली तर इंग्रजी राज्याइतकेच तेही