पान:डी व्हँलरा.pdf/110

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ग १०२ डी व्हॅलेरा आहे म्हणून नव्हे, तर मला शांतता पाहिजे आहे म्हणूनच मी या तहाच्या विरुद्ध आहे. ग्रेट ब्रिटन व आयर्लंड यांमध्ये आज कित्येक शतकें चालत आलेलें वैर या तहाने शमणार नाही म्हणूनच मी या तहाच्या विरुद्ध आहे. आयर्लंडचे स्वातंत्र्य व साम्राज्यसंबंध यांचा समेट करण्यासाठी आपले लोक लंडनला गेले, पण ते जो तह घेऊन आले त्याने एकट्या आयर्लंडचे देखील समाधान होणे शक्य नाहीं, मग आयर्लंड व इंग्लंड या दोन्ही देशांचे समाधान होणे तर लांबच राहिलें ! | आज या घटकेला आयरिश लोक लढाईला कंटाळले असल्यामुळे ते कदाचित् या तहाला संमति देतील. पण मी बजावून ठेवतों, की या तहाने तंटा पुन्हा मूळपदावर आल्यावांचून राहणार नाहीं व पूवीं आयर्लंड इंग्लंडशी जोडले गेले तेव्हापासून आतापर्यंतच्या इतिहासाचीच पुनरुक्ति होईल. डाउनिंग स्ट्रीट येथील ब्रिटिश मंत्र्यांच्या कचेरीत लढाईची धमकावणी देऊन व आमच्या प्रतिनिधींवर पिस्तुले रोखून आमच्या पसंतीचा तह लॉइड जॉर्जनीं धुडकावून लावला खरा, पण पूर्वी पिटचे जसे झाले त्याप्रमाणेच लॉइड जॉर्जला आपल्या कृतकर्माची फळे भोगावी लागतील. युद्धाच्या धमकीने मान्य झालेला हा तह आहे हे विसरता कामा नये. आपल्याला असा तह हवा होता, की त्यामुळे आयरिश लोक व इंग्लिश लोक एकाच दर्जाचे ठरून एकमेकांशी हस्तांदोलन करू शकतील. उलट आजच्या या तहाने ब्रिटिश हे आमचे धनी ठरले अहेत. ब्रिटनच्या राजाविषयीं एकनिष्ठतेची शपथ घेणे म्हणजे त्याला आपला मालक समजण्यासारखे आहे. आयरिश प्रजासत्तेशी ही शपथ पूर्ण विसंगत आहे, व तशी ती विरुद्ध असूनही ती तुम्ही घेणार असलात तर आयरिश प्रजासत्ता उलथून पाडायला तुम्ही उद्युक्त झालांत असेच जग म्हणेल, अशी शरणचिठी लिहून देण्याइतके लाजिरवाणे दुसरे काय असेल ? ज्या या पिढींत अनेक नरवीर असे उत्पन्न झाले की त्यांच्या पराक्रमाने सान्या जगताचे डोळे