पान:डी व्हँलरा.pdf/109

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह झाला पण सिंह गेला । १०१

    • मी वैधव्य कशासाठीं पतकरलें ? माझा नवरा मरण्यास कशासाठी तयार झाला ? मी येथे उभे राहून ब्रिटिशांना राजनिष्ठेची शपथ द्यावी म्हणून की काय ? एकही बंदूक किंवा शिपाई आपल्या जवळ नसला तरी मी हेच म्हणेन. ज्या भूमीवर स्वार्थत्यागी वीरांचे रक्त सांडलेले असते ती प्रजासत्तेलाच योग्य असते. त्या सत्तेचा अवमान कराल तर खबरदार !!

लंडनला गेलेल्या प्रतिनिधींपैकीं जी. जी. डफी व आर. सी. बार्टन यांची जेव्हां भाषणे झाली तेव्हां सभेपुढील तहाच्या प्रश्नांत एक निराळाच अनपेक्षित मुद्दा उपस्थित झाला. त्या दोघांनीही स्पष्ट सांगितले, की तुम्हीं सही केली नाहीं तर आयर्लंडशी युद्ध पुकारण्यांत येईल अशी इंग्लंडकडून धमकी घालण्यात आल्यामुळेच आम्हीं तहावर सह्या केल्या. डेल आयरेनने तह अमान्य करावा असे प्रतिपादन करण्याकरितां डी व्हॅलेरा आपल्या भाषणांत म्हणाला,

    • तह अमान्य करण्याविषयींचा स्वतंत्र ठरावच मीं सभेपुढे मांडला असता. पण कामकाजाच्या नियमांप्रमाणे मला तसे करता येत नाहीं. बाकी हा प्रस्तुत ठराव मान्य करूं नका अशी सभेला विनवणी केल्यानेसुद्धा काम भागेल अशी मला आशा आहे. आयरिश जनतेने आपल्याला निवडून दिलेले आहे. प्रत्येक निवडणुकीच्या वेळी आयरिश प्रजासत्ताक राज्याची आम्ही सेवा करू असे आम्ही लोकांना सांगत आलों. त्या वेळी आपण सारे खोटे बोलणारे लबाड आहोत अशीच लोकांची समजूत होती की काय ? आयलंडच्या राजकीय आकांक्षा व साम्राज्यसंबंध यांचा मेळ घालता येईल की नाही हे पाहण्यासाठी जेव्हां प्रथम निमंत्रण आले तेव्हां तो प्रयत्न करण्यास माझी सवांपेक्षा अधिक तयारी होती. पण आज मी या तहाच्या विरुद्ध आहे याचे कारण इच, कीं या तहानें तो मेळ बसलेला नाही. मला लढाईची हौस