पान:डी व्हँलरा.pdf/108

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१०० डी व्हॅलेरा . मान्य करावा अशी सूचना पुढे मांडण्याच्या वेळच्या भाषणांत आर्थर ग्रिफिथ म्हणाला, | ** सन ११७२ नंतर समतेच्या पायावर इंग्लंडचे सरकार व आयलंडचे सरकार यांजमध्ये झालेला हा पहिलाच तह आहे. आयलंडचे समान हक्क मान्य करणारा हा पहिला तह आहे. हा समतेचा तह आहे म्हणूनच मी याला अनुकूल आहे. आयर्लंडच्या स्वतंत्र राज्याला मान्यता देणारा तह मिळवून आम्ही लंडनहून आलो आहोत. आपला गमावलेला झेंडा आम्ही घेऊन आलो आहोत. यापुढे ब्रिटिश सैन्याने आयर्लंड सोडून जावे व आयर्लंडने स्वतःच्या सैन्याची उभारणी करावी असे ठरवून आम्ही आलो आहोत. राष्ट्राच्या तिजोरीच्या किल्लया आमच्या हातीं रहाव्या, परराष्ट्रीय धोरण आमचे आम्ही ठरवावे, अशा प्रकारचे सारे महत्त्वाचे हक्क काबीज करून आम्ही आलो आहोत. मिशेल कॉलिन्स व डगन यांनी तहाला अनुकूल भाषणे केलीं. दोन्ही बाजूंचे वक्ते आवेशपूर्ण भाषणांनी आपापल्या मतांचे समर्थन करीत होते. रोजच्या रोज वक्तृत्वाच्या लाटा उचंबळत होत्या. त्यामुळे १९२२ सालचा जानेवारी महिना उजाडला तरी डेल आयरेनची बैठक चाललेलीच होती. कॉर्कचा माजी मेयर टेरेन्स मॅस्विनी याची बहीण मेरी मॅस्विनी इचें आवेशाने, वक्तृत्वाने व देशभक्तीच्या भावनेने भरलेले भाषण इतके सरस वठलें, की ती पावणे तीन तास बोलत होती तेवढा सारा वेळ सभा चित्रासारखी तटस्थ बसली होती. तिचे भाषण डी व्हॅलेराच्या बाजूचे होते. तिने स्पष्ट बजावले, कीं या तहाप्रमाणे आयरिश फ्री-स्टेट अस्तित्वात आलें तर त्या सरकाराला प्रथम तिला कैदेत टाकण्याचे काम करावे लागेल. मिस मॅस्विनीप्रमाणेच मिसेस ओलंघन या बाईचे भाषण अतिशय आवेशपूर्ण झाले. तिच्या देशभक्त नव-याचा पूर्वी सरकारी शिपायांनी खून केला होता. या गोष्टीचे सर्वांना स्मरण करून देऊन ती ओरडून म्हणाली,