पान:डी व्हँलरा.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह झाला पण सिंह गेला ९९ व्हावयाचा आहे व तो तुम्हीच करावयाचा आहे. पूर्ण स्वातंत्र्य म्हणजे भ्रम आहे असे तुम्हांला सांगण्यांत येते. पण ज्यामुळे ब्रिटिश राजा, ब्रिटिश प्रधानमंडळ व ब्रिटिश पार्लमेंट यांच्या सत्तेचे या देशांतून पूर्ण उच्चाटण होईल, लॉइड जॉर्जच्या कचेरीला सदा एक कान लावून येथील कारभार चालविणान्या गव्हर्नर जनरलची ज्यामुळे बोळवण होईल, आणि ज्यामुळे आयरिश स्त्रीपुरुषांची खरी सत्ता देशांत चालू होईल ते स्वातंत्र्य म्हणजे भ्रम की काय ? ते पूर्ण स्वातंत्र्य निवळ स्वप्न आहे असे तुम्हांला सांगून, लॉइड जॉर्ज तुमच्या विरुद्ध लढाई पुकारील अशी तुम्हांला भीति दाखविण्यात येते. पण थोडा विचार करून पहाल तर तुमचे तुम्हांलाच स्पष्ट दिसेल, की पूर्ण स्वातंत्र्य हे स्वप्न नव्हे, आणि लॉइड जॉर्जने युद्धाचे कितीही अवसान आणले तरी खरोखरीच युद्ध पुकारण्याची आज त्याची हिंमत नाहीं. | म्हणून तुम्हांला जे सत्य वाटते त्याचा आग्रह धरा. देशबांधवांनों, मोहाला वश होऊन अब्रूचा सीधा मार्ग सोडून जाऊ नका. आज एकदां तुम्ही भिऊन कचरलांत आणि थोडीशी माघार घेतलीत, कीं ही माघार सारखी चालू राहील आणि तुमची पुरती पीछेहाट होऊन स्वातंत्र्य पुरते नाहीसे होईल. इमॉन डी व्हॅलेरा. । डेल आयरेनचे प्रथम एक खाजगी अधिवेशन झाले. त्या वेळी डी व्हॅलेराने आपली तहाची योजना पुढे मांडली व सर्वांचे एकमत व्हावे यासाठी त्याने अनेक सूचना करून पाहिल्या. पण चार दिवस सारखी चर्चा होऊनही कांहींच निष्पन्न झाले नाही. शेवटी १९ डिसेंबर रोजी डेल आयरेनच्या जाहीर अधिवेशनास प्रारंभ झाला. ज्या तहावर प्रतिनिधींच्या सह्या झाल्या होत्या त्यास मान्यता दर्शविणे अगर तो अमान्य करणे हेच काय ते काम सभेपुढे होते. तह