पान:डी व्हँलरा.pdf/105

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तह झाला पण सिंह गेला ९७ झुंज चालली असतांना शत्रूच्या हुकमतीखालीं वागून या वृत्तपत्रांनी तुमच्या नीतीचा प्रवाह गढूळ करण्याचे निंद्य कर्म केले. नंतर मागच्या जुलई महिन्यांत शत्रु तहाचे बोलणे करण्याच्या विचारांत असतांना ज्या शिस्तीच्या जोरावर तुम्ही यशस्वी झालांत त्या शिस्तीचा मोड करण्याचे पाप याच वृत्तपत्रांनीं केले, आणि अगदीं परवां परवां देशाचे प्रतिनिधी लंडनमध्यें तहाचीं खलबते करीत असतांना याच वृत्तपत्रांनी. शत्रूची बाजू सबळ करण्याचा अधमपणा केला. ती वृत्तपत्रे आज तुम्हांला इशारा देण्याऐवजी तहाच्या मसुद्याकडे मेंढरांप्रमाणे दौडत नेत आहेत यांत आश्चर्य ते कसले ? पण असल्या भलत्या घोडदौडीनें तुम्ही शत्रूच्या जाळ्यांत सांपडलांत, तर जे जग आज तुमच्या वीरश्रीची स्तुति करीत आहे ते तुमच्या अक्कलशून्यतेचा उपहास व तिरस्कार करील हे विसरू नका. ज्या तहाबद्दल तुमचा तुम्हांसच पुढे तीव्र पश्चात्ताप होईल व तुमची मुलेबाळे तुम्हांला शिव्याशाप देतील त्या तहावर उतावळेपणाने सही करू नका. हा तह म्हणजे तंट्याचा कायमचा निकाल आहे, असे सोंग करून त्या तहावर सील ठोकावयास तुम्ही उद्युक्त झाला आहांत; पण माझी खात्री आहे, कीं हा तह म्हणजे खरा निकाल नव्हे. या तहाने भांडण थांबणे शक्य नाहीं असेंच तुमचे मन तुम्हांला सांगत असेल. इंग्लंडशीं वागण्यांत आयलंड आजपर्यंत कधी चकलें नाहीं, मग आजच त्याला को चकू देतां ? आयरिश स्वातंत्र्यासाठी चाललेल्या युद्धाचा नैतिक पाया ढासळू देऊ नका. मनोभावाने आणि प्रामाणिकपणानें हो तह पाळणे शक्य नाहीं असे तुमचे अंतःकरण तुम्हांला सांगत असतां त्याला मान्यता कां देतां ? जे लोक तुम्हांला तह मान्य करण्याचा बदसल्ला देतात ते आयर्लंडचेही हितचिंतक नव्हत, किंवा इंग्लंडचे, किंवा मानवजातीचेही हितसाधक नव्हत. तुम्ही आपल्या पायावर धोंडा पाडून घ्यावा म्हणून तुम्हांला जे आग्रह डी...७