पान:डी व्हँलरा.pdf/104

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

I0 ९६ डी व्हॅलेरा पूर्ण करणा-या तहाचा तपशीलवार मसुदा त्याने लिहून काढला होता, व त्यांत वर निर्दिष्ट केलेले त्याचे तीन कटाक्षाचे मुद्दे त्याने अंतर्भूत केले होते. इंग्लंडने सुचविलेला तह आयर्लंडने मान्य करूं नये म्हणून डी व्हॅलेराने आपल्याकडून शक्य तितकी खटपट केली. डेल आयरिनमध्ये तहाची चर्चा होण्यापूर्वी आयरिश लोकांस उद्देशून त्याने एक जाहिरनामा काढला. तह पास केला असतां काय दुष्परिणाम होतील, व तह अमान्य केल्याने अंतिम हित कसे साध्य होईल याविषयी त्या जाहिरनाम्यांत थोडक्यांत विवेचन केले होते. तो जाहिरनामा असा होता.

    • देशबांधवांनो,तुमच्यावर अरिष्ट कोसळणार आहे, संभाळा ! एखाद्या सैन्यांत एकदम उद्भवलेल्या पटकीच्या रोगाहूनही भयंकर अशा परिस्थितीत तुम्ही सांपडला आहात. दुष्काळाचे भयंकर दिवस काढल्यानंतर माणसाला ज्याप्रमाणे अन्नाची अनावर लालसा वाटते त्याप्रमाणे इतकी वर्षे लढाईच्या धांदलीत घालविल्यामुळे विश्रांतीसाठी तुम्ही उत्सुक झालेले असलात तर ते सहाजिकच आहे. पण या तुमच्या नैसर्गिक इच्छेचा फायदा घेऊन तुमचे शत्रू आपले कारस्थान पार पाडीत आहेत हे विसरू नका. या वेळी तुम्ही गाफिल राहिलांत तर आजपर्यंतचा तुमचा सारा स्वार्थत्याग व्यर्थ ठरेल, जे मिळविले आहे. तेही नष्ट होईल, आणि अल्पावधीतच तुम्ही सर्वस्वाला मुकाल. | ‘शांतता', 'शांतता', असा नुसता घोष करून को शांतता मिळत असते ! जे असला घोष आज करीत आहेत ते तुम्हांला शांतता तर मिळवून देणार नाहींतच; पण तुमच्या भरंवशाचा फायदा घेऊन तुमचा घात मात्र करतील. तुमची वर्तमानपत्रे खरीखुरी राष्ट्रीय असती तर त्यांनी तुम्हांला या तहाविरुद्ध इशारत दिली असती. पण ती राष्ट्राला योग्य सल्ला देण्याऐवजी राष्ट्रकार्याचा बिघाड करावयालाच उपयोगी पडणारी आहेत. मागे आपली व आपल्या शत्रूची निकराची