पान:डी व्हँलरा.pdf/10

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

२ डी व्हॅलेरा

कांहीं वेळ अनिश्चित वृत्तीने पाहून त्या मुलाने शेवटीं तारकांचे अमेरिकन निशाण घेतले. ते पाहतांच दुकानदार हंसत हसत म्हणाला, “बरं,आतां तें दे, अन् हे छान छान निशाण घे !

अं! नाहीं, नाहीं ! असे पुटपुटत त्या बालकाने हातांतील निशाण अधिकच घट्ट धरून ठेवले आणि आपला हात मागे घेतला.

बरं, बरं, नको देऊंस ! ही दोन्ही निशाणं घे तुला, मग तर झालं? असे हंसत हसत म्हणून त्या दुकानदाराने आपल्या हातांतील युनिअन जंक् त्या बालकाच्या कोटाच्या खिशांत घातले.

पण तो बालक पक्का हट्टी होता. त्याने ते खिशांतील निशाण ताबडतोब बाहेर जमिनीवर भिरकावून दिले, आणि रागाने डोळे वटारून पहात तो त्या दुकानदारासमोर मोठ्या ऐटीने उभा राहिला.

त्या वेळीं एक वृद्ध आयरिश गृहस्थ तो सारा प्रकार पहात दुकानापाशी उभा होता. त्या चिमुकल्या मुलाची ही विलक्षण कृति पाहून तो चटकन पुढे झाला, त्याने त्याला उचलून आपल्या हृदया घट्ट धरले, त्याचे कितीही मुके घेतले तरी त्याचे समाधान होईना, आणि त्याच्या नेत्रांतून वाहू लागलेल्या अश्रुधाराही कांहीं केल्या थांबेनात. जुन्या आयरिश देशभक्तांनी स्थापिलेल्या 'फेनिअन पक्षाचा हा वृद्ध आयरिश गृहस्थ होता. त्याच्या मते युनिअन जॅक हे जुलमाचे चिन्ह होते आणि अमेरिकेच्या निशाणावर स्वातंत्र्याचा कैवार लिहिलेला त्याच्या दृष्टीला दिसत होता. त्यामुळे एका निशाणाचा धिक्कार करून दुस-याचा स्वीकार करणा-या त्या सुंदर, धीट बालकाला पाहतांच त्याचे हृदय स्वदेशाभिमानाने आणि कौतुकाने भरून आले.

एखाद्या कुशल चित्रकाराने त्या वेळचा तो प्रसंग फलकावर रंगविला असता तर त्याचे चित्र अजरामर झाले असते यांत संशय नाहीं. अपमान झाल्यामुळे रागावलेल्या दृष्टीने त्या जमिनीवर पडलेल्या युनिअन जैककडे पाहणारा तो इंग्रज दुकानदार, त्या मोहक बालकाला