पान:डी व्हँलरा.pdf/9

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आयरिश धुरंधर डी व्हॅलेरा प्रकरण पहिले धिटुकला मुलगा ती संध्याकाळची वेळ होती. न्यूयॉर्क शहरामधील एका रस्त्याच्या बाजूला लागून असलेल्या एका घराच्या उंब-यावर एक गौरवर्ण, मध्यम वयाची, सुंदर स्त्री आपल्या दोन अडीच वर्षांच्या बाळसेदार मुलाला कडेवर घेऊन उभी होती. रस्ता जरी फार गजबजलेला नव्हता तरी प्रचंड न्यू यॉर्क शहरांतील रस्ता तो ! तेथील कमी गर्दी म्हटली तरी आपल्याकडील मोठ्या शहरांतील ऐन रहदारीपेक्षा अधिक असावयाची ! रस्त्यांतील नाना प्रकारच्या गमती बोटाने दाखवीत व त्याला समजेल अशा बोबड्या भाषेत बोलत ती स्त्री आपल्या मुलाला खेळवीत होती. पण मातेच्या कडेवर बसून दुरून गंमत पाहणे त्या मुलाला फार वेळ रुचलें नाहीं. तो कडेवरून खाली उतरला, आणि आईच्या आवरण्याला . न जुमानतां चिमुकलीं पावले टाकीत समोर दुकान होते त्या दुकानापाशी जाऊन उभा राहिला. दुकानाचा मालक एक इंग्रज गृहस्थ होता. त्या छोट्या लबाडाची ती चपळाई पाहून त्याला फार कौतुक वाटलें, व विक्रीस ठेवलेल्या लहान लहान निशाणांपैकी दोन निशाणे त्याच्यापुढे करून तो म्हणाला, “ये बाळ, यांपैकी तुला कोणचे निशाण हवे ??? त्या दोन निशाणांपैकी एक इंग्लंडचे युनिअन जंक होते व दुस-यावर पट्टया पट्टया आणि तारका काढलेल्या होत्या. त्या दोन निशाणांकडे