पान:डी व्हँलरा.pdf/11

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

धिटुकला मुलगा हृदयाशी धरून त्याच्यावर अश्रूचा वर्षाव करणारा तो वृद्ध गृहस्थ, किंचित् आश्चर्याने व कुतूहलाने त्या वृद्ध गृहस्थाकडे पाहणारा तो धीट व बाळसेदार मुलगा, या हृदयस्पर्श प्रसंगाकडे काडीचेही लक्ष यावयास सवड नसलेल्या स्त्रीपुरुषांची रत्यावरील गर्दी, दोन्ही बाजूच्या |त्या टोलेजंग उंचे उंच इमारती, इतके नयनमनोहर दृश पाहण्याचे भाग्य क्वचितच एखाद्याला लाभते. | हा मुलगा दुसरा कोणी नसून आज जगांत प्रत्येक स्वातंत्र्यभक्त ज्याचे नांव परमादराने उच्चारतो तो डी व्हॅलेराच होय. डी व्हॅलेराचे पाळण्यांतील सबंद नांव इमॉन डी व्हॅलेरा असे आहे. न्यूयॉर्क शहरी सन १८८२ मध्ये आक्टोबरच्या १४ तारखेस त्याचा जन्म झाला. म्हणजे टेरेन्स मॅकस्विनीपेक्षां डी व्हॅलेरा हा तीन वर्षांनी लहान. डी व्हलेराच्या बापाचे नांव व्हिव्हिअन डी व्हॅलेरा असे होते, व तो आयलंडचा रहिवाशी नसून स्पेनचा रहिवाशी होता. डी व्हॅलेराची आई मात्र अस्सल आयरिश रक्ताची होती. तिचे नांव कॅथराइन कोल. स्पॅनिश पिता आणि आयरिश माता अशा प्रकारे डी लेराचा जन्म झाला यांत कांहीं आश्चर्य नाही. उलट, प्राचीन कालापासून आयलंडे व स्पेन या दोन देशांचे जे जिव्हाळ्याचे स्नेहसंबंध चालत आले आहेत, त्यांची ही एक साक्षच होय. जनरल वॉल, ओंडोनेल, ओहिगिन्स वगैरे अनेक आयरिश सेनापतींनीं व मुत्सद्यांनी स्पेन देशाची जी सेवा केली व जिची साक्ष प्रत्येक शतकाच्या इतिहासांत स्पष्टपणे सांपडते. त्या सेवेची फेड करण्याकरितांच जणू काय परमेश्वरी सूत्रानुरूप डी व्हॅलेरानें स्पैनिश पित्याच्या पोटी जन्म घेतला ! | डी व्हॅलेराचा बाप व्हिव्हिअन हा मूळचा स्पेन देशाचा रहिवाशी, पुढे कित्येक वर्षांनी त्याने मायदेश सोडून अमेरिकेस प्रयाण केले. तो विद्वान्, बहुश्रुत आणि व्यासंगी होता. अनेक भाषांवर त्याने प्रभुत्व मिळविले होते. त्याचा मुख्य धंदा चित्रकाराचा होता. पण त्याचं