पान:ज्योतिर्विलास.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

दिव्य भ्रमण. न्येस तारा उगवतात त्यांचा मार्ग पूर्वेकडच्यांपेक्षाही मोठा असतो. तो क्रमण्यास त्यांस चवदा पंधरा तास लागतात. त्या अर्ध्या मागीत येतात तेव्हां त्यांजकडे पाहणे झाले तर आपल्यास उत्तरेकडे तोंड करावे लागते. अगदी उत्तरेकडील टोकाशी जमिनीच्या जवळच तारा दिसतात, त्यांचा प्रकार उलटच दिसतो. म्हणजे आकाशांतील इतर तारा सामान्यतः पूर्वेकडून पश्चिमेकडे जातात असे दिसते; आणि ह्या पहाव्या तों पश्चिमेकडून पूर्वेस जात असतात. तिसरा नक्षत्रपट पहा. त्यांत आग्नेयी कोपऱ्याच्याही दक्षिणेस अगस्त्य नुकताच उगवत आहे. नक्षत्रपट अंक १ यांत तो नैऋत्य कोपऱ्याच्या दक्षिणेस मावळण्यास गेलेला आहे. आकाशांत तो याप्रमाणेच दिसेल. आणि त्यावरून तो फार वर येत नाही हेही समजून येईल. जानुआरीच्या आरंभी, रात्री सुमारे सात साडेसात वाजतां, अगस्त्य उगवतो. साडे अकरा वाजतां पाहिलात, तर तो मध्यान्हवृत्तावर आलेला दिसतो. आणि पहाटेस सुमारे साडेतीन किंवा चार वाजतांच मावळतो. मध्यान्हवृत्तावर असतां, दक्षिण दिशेपासून तो सुमारे १८१२० अंश मात्र वर दिसतो. काशी येथे तर तो १२ अंश मात्र वर दिसतो. आणि सुमारे सात तासांतच उगवून मावळतो. मृगाच्या पोटांतल्या तीन तारा पूर्वेस उगवून पश्चिमेकडे मावळतात. अश्विनी त्यांच्या उत्तरेकडून जातात. अभिजित् त्याहून उत्तरेकडून जातो. सप्तर्षि तर फारच उत्तरेस असतात. वाचक म्हणतील की 'नकाशांत अगस्त्य दिसला, परंतु आकाशांत तो कसा ओळखावा ? मध्यान्हवृत्त, क्षितिज, अंश, हे काय गूढ आहे ?' 'जरा दम धरा, मी सांगतो,' असे म्हटले तर लागलेच आमचे रंगेल वाचक म्हणतील की 'या लचांडांत आम्हांला कशाला घालितां? आम्हांस कोठे आतां सहावी यत्ता द्यावयाची आहे ? ' कोणी म्हणतील, 'आमी सहावीतून पार पडलों तेव्हां घोकपट्टी केली तेवढी पुरे; आतां नको ती जन्मभर !' दुसरे म्हणतील, 'आह्मी मॅट्रिक्युलेट झालों तेव्हां कांहीं घोकले होते खरे. मग राइटअसेन्शनची डेफिनिशन् डेक्लिनेशनला सांगितली, की काय केले असेल कोणास ठाऊक ? वडाची साल पिंपळास लाविली ता असो की कांही असो, कसे तरी एकदां पास झालों खरें! आतां नंको तो त्रास.' अकोणी म्हणतील, 'आम्ही ग्याजुएट झाल्यास किती तरी काळ लोटला ? तेव्हां आपरंम्हांस कांहीं समजले असले तरी आता त्याचे कोणास स्मरण राहिले आहे ? आतां आमच्या डोक्याला विनाकारण श्रम कां देतां ?'-पण प्रिय वाचकहो, तुम्ही कदाचित् नुसती बुकें पाहिली असतील; आतां आकाशाकडेही पहा. म्हणजे तुम्हांस ली हा विषय समजण्यास तास वाटणार नाही. चांदण्यांत बसला असला तर तेथून उठण्याची गरज नाही. नक्षत्रांची ओळख करून घ्यावयाची असेल तर प्रथम उघ या जागी बसतांनाच पुस्तक घेऊन बसण्यास विसरूं नका. आणि वान्याने जाणार नाही, असा दिवा जवळ ठेवा. नाहीतर घरांतील दिव्याशी नक्षत्रपट पाहून मग वर * या सर्वांचे अधिक वर्णन पुढे होईल.