पान:ज्योतिर्विलास.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१२ ज्योतिर्विलास. विस्तार एक इंच होता. तरी त्याच्या मंडलाची रुंदी सुमारे २०० फूट हाता. ती पाहून चमत्कार वाटे. - आतां मध्यवर्ती तेजोगोलापासून मी सुमारे ७ मैल लांब आलो होतो. फार अंतरामुळे तो गोल बारीक दिसत होता. त्यापासून सुमारे १४ मैलांवर आणखा एक गोल दिसू लागला. मी तेथपर्यंत गेलो नाही; तरी दिव्यदृष्टीने मला दिसल की तो सुमारे १६ इंच व्यासाचा आहे, व त्याला चार परिचारक आहेत. त्याच्याही पलीकडे एकंदर २२ मैल अंतरावर आणखी एक गोल दिसला. तो मागच्याहून किंचित् मोठा होता, व इतक्या अंतरावरूनही तो मधल्या तेजोगोलास प्रदक्षिणा करितो आहेसे दिसले. त्याचा तो मार्ग किती अवाढव्य ! माझ्या जन्मांत त्याची अर्धी तरी प्रदक्षिणा पुरी होईल की नाही याचा मला संशयच वाटला. .याला एकच परिचारक मला दिसला. S . शनि युरेनस नेपचुन् पृथ्वी शुक्र मंगळ बुध चित्रांक ३–ग्रहांचे सापेक्ष आकार. मी आतां इतका लांब आलो होतो की, मला दिव्यदृष्टि आलेली होती, न मात्र तो पहिला छोटेखानी गोल मला दिसत होता. त्याची काय अहव