पान:ज्योतिर्विलास.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



स्वप्न-खरेंच.    ११

वर्ती तेजोगोलाखेरीज इतर सर्वांहून तो मोठा होता. त्याचा व्यास सुमारें ३|| फूट होता. तो चांगला तेजस्वी दिसे; व त्यावर तांबडे, पिवळे व जांभळे सुरेख पट्टे दिसत होते. ते अगदी रेखल्यासारखे दिसत. तो गोल आपल्या भोवती फार जलद फिरतो, यामुळे ते पट्टे तसे दिसत असे वाटते. हा आमच्या कल्पक प्राण्यांच्या

गोलाहून इतका मोठा होता तरी इतका जलद फिरे की, त्याच्या दोन स्वप्रदक्षिणा होत तो ह्याच्या पांच होत. असें होतें तथापि तो आपल्या स्वामीच्या आज्ञेत राहून नेहमी त्या भोवती फिरे. ह्याही गोलाची एक विलक्षण गोष्ट दिसली. त्याच्या भोंवती ४ छोटे गोल फिरत होते; जणुकाय ते त्याचे सेवकच आहेत. आपल्या नायकापासून ते ११, १८, २८ आणि ४८ फूट अंतरावर होते. त्यांचा व्यास सुमारे एक इंचापासून दीड इंचपर्यंत होता. हे सर्व गाडे अगदी सुयंत्र चालले होते, ते पाहून मौज वाटे.

 ज्वलद्गोलापासून सुमारे ७ मैलांवर आणखी एक भव्य परिणालिका दिसली. तीतला मधला गोल मागच्या इतका नव्हता तरी बराच मोठा होता. त्याचा व्यास सुमारे ३५ इंच होता. ह्यावरही त्याप्रमाणेंच पट्टे होते. परंतु एकंदरीत हा अंमळ काळसर होता. ह्याच्या स्वरूपांत दुसराच एक विलक्षण प्रकार होता. त्याच्या भोवती कांहीं वलये होती. ती त्या गोलास कोठेही लागलेली दिसत नव्हती, तरी त्याच्या अर्ध्या वचनांत असल्याप्रमाणे त्यास सोडून जात नसत. जसे काय ती त्याचेच अवयव आहेत. त्यांचा व्यास ८० इंच होता, व त्यांची जाडी सुमारे १८ इंच होती. बारीक नजरेने पाहिल्यास ती अनेक वलये दिसत. त्या सर्वांची चकाकी सारखी नव्हती. ती बारीक कणांची बनलेली आहेत, व ते कण स्वतंत्रपणे त्या गोलाभोवती फिरत आहेत, असे दिसे.

 याखेरीज मागल्या गोलाप्रमाणे ह्याच्या भोंवतीही ह्याचें मंडल होते. त्या मंडलांत ८ परिचारक होते. ते निरनिराळ्या अंतरावर त्या भोवती फिरत. त्यांतला सहावा सर्वांत मोठा होता. त्याचा व्यास सुमारे दीड इंच होता; तो मुख्य गोलापासून ३३ फुटांवर होता. शेवटचा लहानसाच होता. त्याचा