पान:ज्योतिर्विलास.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

हा काय चमत्कार आहे? शोभा आली, की हिने तिला आली, अशी भ्रांति पडून ही पहावी की ती अव करावी असे होऊन गेले. शारदचंद्र कुमुदांसही आनंद देऊन प्रफुल्लित करू गला, मग तो आह्मासारख्यांस आनंदकारक होईल यांत काय नवल ? सहा मा न्यांपूर्वी सायंकाळी पश्चिमक्षितिजाजवळ ज्या तारा दिसत असत त्या हल्ली सायका पूर्वेस दिसू लागल्या; इतके त्यांचे दूरगमन झाले तरी त्यांचे परस्परांचे अंतर बदलल नाही. तेव्हां तारांस गति आहे की नाही, असा आम्हांस संशय आला; व ताराबरोबर पश्चिमेस सायंकाळी शुक्र दिसत होता तोही पूर्वेस आला की काय म्हणून पाहूं लागलों, तो तो मात्र कोठे दिसेना; तो काय झाला? नाहीसा झाला की काय? असें गूढ पडले.* असो तर, याप्रमाणे कांहीं तारा पश्चिमेस नाहीशा होत जातात, व पूर्वेस नव्या तारा उगवू लागतात; सहा महिन्यांनी पश्चिमच्या तारा पूर्वेस दिसू लागतात, तरी त्यांचे अंतर बदलत नाहीं; शुक्रासारख्या काही तारा इतरांसारख्या स्थिर न राहतां त्यांतून चालतातशा दिसतात; चंद्र तर विलक्षण झपाट्याने चालत असतो इतकंच नाही, तर पंधरा दिवस लहानाचा मोठा होत जाऊन पुनः लहान होऊ लागतो व शेवटी दोन दिवस तर मुळीच दिसत नाहीं; कांहीं तारा पतन पावतातशा दिसतात; काहींना तेजाचे भव्य पुच्छ असते; कांही दिवस तारांच्या ठिकाणी अभ्रे आणि विजा हीच संचार करितात; सूर्यचंद्रासारख्या तेजोगोलांवर डाग दिसतात; दुर्बिणीतून शुक्र चंद्रासारखा दिसतो व एका तारेच्या ठिकाणी हजारों तारा दिसतात. अशा विलक्षण उलाढाली व गूढे पाहून सहज कोणीही मनुष्य आपले मनास विचारूं ला. गतो की, हा चमत्कार आहे तरी काय ?

  • ज्योतिःशास्त्राच्या विषयांचे दिग्दर्शन करणाऱ्या ह्या उद्घातरूप प्रकरणांत एथवर वर्णिलेली आकाशांतील तारकादिकांची स्थिति सामान्यतः कोणत्याही काली घडण्यासारखी आहे; व विशे. षतः ती सन १८९२ च्या एप्रील महिन्यापासून सात आठ महिन्यांमधली आहे.

ERAL LIBRARY AANKHED GENERO सावजनिक वाचनालय खेड, (गे.)