पान:ज्योतिर्विलास.pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. ला आहे. मृगाच्या पोटांतील बाणाच्या दक्षिणेस ३ लहान तारा आहेत. (त्यांस युरोपियन लोक ओरायनची तरवार म्हणतात) त्यांतील मधल्या तारेच्या म्हणजे परिशिष्टांतील मृगापैकी सहाव्या तारेच्या भोंवतीं हा तेजोमेघ आहे. असा तेजस्वी आणि चित्रविचित्र तेजोमेघ उत्तर गोलार्धात नाही. नुसत्या डोळ्यांनी देखील पूर्वोक्त चित्रांक १४-मृगांतील तेजोमेघ. तारेभोवती तेजोमेघाचा भास होतो. हल्लीच्या अति मोठ्या दुर्बिणीतून ह्यांत श. कडो तारा दिसतात. तथापि वर्णलेखावरून दिसून आले आहे की तो घन पदार्थ नाही, तप्तवायु आहे. व त्यांत हायड्रोजन व नायट्रोजन ह्या दोन वायूच नमः श्रण आहे. तारांची गतिः-वर्णलेखकयंत्राने खस्थ ज्योतींची भौतिक घटना समजू लागली आहे, तसेच ते दुसऱ्या एका महत्त्वाच्या शोधाचे साधन झाले आहे. कमजास्त तिर्यक रेषेनें कांहीं तारा आपल्याकडे येत आहेत, व कांही आपल्यापासून दूर जात आहेत. काटकोणत्रिकोणाच्या कर्णरेषेने होणारी त्यांची गति आपल्यास त्याच्या दोन बाजूंतून दिसते. म्हणजे एक आकाशांत आडवी दिसते आणि दुः सरी तारांकडे पाहण्याची आपली जी दिशा म्हणजे दर्शनरेषा तीत अनुभवास येते. यांपैकीं आडवी म्हणजे आकाशांत पूर्वपश्चिम किंवा कोणत्या तरी दिशेस दिसणारी गति दुर्बिणीने पुष्कळ वर्षे समजली आहे. तिला वास्तवगति म्हणतात. ती कांही तारांची वर्षांत ४ पासून ७ विकला आहे. आणि बहुतेक तारांची शंभर वपर्षांत थोड्याशा विकला आहे. ही गति सर्व तारांची एका नियमाने होत आहे असे नाही. तिची माने आणि दिशा निरनिराळ्या आहेत; आणि ती सरळरेषेत