पान:ज्योतिर्विलास.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तारका. आहे. तारा जर कक्षांत फिरत असतील तर त्या कक्षांची वक्रता गेल्या २०० वषांत मुळीच दिसून आली नाही. ही गति काही तारापुंजांची मात्र बहुतेक सारखी आहे. उदाहरणार्थ, कृत्तिका आणि रोहिणी यांच्या मधील सर्व तारांची वास्तवगति समान आहे. तसेच, सप्तर्षीपैकी मरीचि आणि ऋतु हे खेरीज करून पांचांची समान आहे. दर्शनरेषेतली गति वर्णलेखकयंत्राने सुमारे इ० स० १८६५ पासून समजू लागली आहे. कांहीं तारा दर सेकंदास ४०५० मैल वेगानें आपल्याकडे येत आहेत व कांही ११।२० मैल वेगाने आपल्यापासून दूर जात आहेत. यांत व्याधाच्या गतीत चमत्कार दिसून आला आहे. प्रथम दर सेकंदास सुमारे २० मैलप्रमाणे त्याचे निर्गमन होत होते. परंतु तो वेग कमी होत जाऊन आतां त्याचे आगमन होऊ लागले आहे. इतर तारांप्रमाणे आपल्या सूर्यासही गति आहे. सुमारे विषुवांश १७।२२।४० क्रांति उ० ३९५६ या बिंदूकडे म्हणजे शौरिनामक पुंजांतील एका बिंदूकडे आपला सूर्य सपरिवार चालला आहे. ही गति फार थोडी म्हणजे शंभर वर्षांत सुमारे ३७ विकला आहे. दर सेकंदास तो ३।४ मैल जातो असे कोणाचे मत आहे; कोणाच्या मते त्याची गति यापेक्षां जलद आहे. सूर्य जिकडे चालला आहे तिकडील तारा आपणाकडे येत आहेत व उलट दिशेच्या दूर जात आहेत असे सामान्यतः दिसून आले आहे. म्हणजे आपल्या सूर्याच्या गतीमुळे त्यांस गति दिसते. परंतु त्यांची सर्वच गति भासमान नाहीं; तिचा काही अंश वास्तव आहे असे सिद्ध झाले आहे. ENERAL LIB-710 BABY KE सावजनिक नवजाला खेड, (पुणे)