पान:ज्योतिर्विलास.pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. अगदी जवळून जातात, त्यामुळे त्यावर डाग दिसतात. व त्याप्रमाणेच एकादा मोठा धूमकेतु फार कालाने एकाद्या तारेवर आपटल्यामुळे ती प्रदीप्त होते. आपला सूर्य कधी प्रदीप्त होईल की काय अशी शंका येते. परंतु लक्षावधि तारांत एकादी तारा काही वर्षांनी प्रदीप्त होते, ही गोष्ट मनांत आणली म्हणजे भयाचे कारण नाही. तारकायुग्मः-नुसत्या डोळ्यांनी जेथें एक तारा दिसते तेथे दुर्बिणीतून दोन तारा दिसतात अशी पुष्कळ उदाहरणे आहेत. अशा दोन तारांस तारकायुग्म अथवा जोडतारा म्हणतात. परिशिष्ट १ यांतील रोहिणींतील चवथी तारा; मृगांतली पहिली, चवथी, पांचवी, सहावी; व्याध; पुनर्वसूंपैकी पहिली; मघा पांचवी; त्रिशंकु दुसरी; दक्षिणक्षे सातवी; आप; ज्येष्ठा दुसरी ( योगतारा ) ह्या जोडतारा आहेत. यांत कांहींची जोडी लहान दुर्बिणीनेही दिसते. काहींची मोठ्या दुर्बिणीने मात्र दिसते. ज्या तारांच्या जोडीमध्ये १५ विकलांपेक्षा जास्त अंतर आहे त्या नुसत्या डोळ्यांनी एक दिसल्या तरी दुर्बिणीतून फार दूर दूर दिसतात. म्हणून ज्योतिषी त्यांस जोडतारा म्हणत नाहीत. हल्ली सुमारे सहा हजार जोडतारांचा शोध लागला आहे. फार थोड्या अंतराने असणाऱ्या जोडीचा वास्तविकच काही संबंध आहे की काय हे सर्वाविषयी निश्चयाने सांगता येत नाही. काही जोड्या पृथ्वीपासून एका सरळ रेषेत असतात म्हणून मात्र तशा दिसतात. परंतु ज्या ज्या जोडीमध्ये फार थोड्या विकलांचे अंतर आहे तिचा काही तरी भौतिक संबंध असावा असे दिसते. हा संबंध कांहींचा अनुभवास आलेला आहे. त्यांतल्या तारा आपल्या गुरुत्वमध्याभोवती प्रदक्षिणा करितात. अशा जोडीस मिथुनमाला म्हणतात. सुमारे १२ मिथुनमालांचा प्रदक्षिणाकाल निश्चित झाला आहे. तो सुमारे २५ पासन १०० वर्षेपर्यंत आहे. काहींचा शेकडो वर्षे असेल. ज्या जोडीचा प्रदक्षिणाकाल थोडा आहे ती फारच निकट आहे. व्याधाच्या वास्तव गतीमध्ये कांहीं अनियतता दिसते. त्यावरून त्याच्या जवळ एकादी तारा आहे असे अनुमान करून तिची कक्षा आणि प्रदक्षिणाकाल ज्योतिष्यांनी गणिताने काढिला. त्यावर बरीच वर्षे ती तारा कोणास दिसली नाही. परंतु १८६२ मध्ये १८ इंच भिंगाच्या दुर्बिणीतून ती दिसली. तेव्हां ती गणिताने वर्तविलेल्या स्थळीच व्याधापासून १० विकलांवर होती. पुनर्वसूच्या चवथ्या तारेजवळ एक 'सहचरी' आहे असें अनुमान आहे. कांहीं तारा तिहेरी व काही चव्हेरी आहेत. युग्मांतली एक अथवा दोन्ही तारा स्वतः युग्म असल्यामुळेच अशी बहुतेक त्रिके आणि चतुष्कं झाली आहेत. तारकागुच्छः-दुर्बिणीतून फार बारीक तारा दिसतात, त्या सर्वत्र सारख्या पसरलेल्या नाहीत. त्यांचे बहुधा दाटपुंज झालेले आहेत त्यांस आपण तारकागुच्छ म्हणं. कृत्तिका नक्षत्र हा नुसत्या डोळ्यांनी दिसणारा गुच्छ होय. त्यांत ६ किंवा ७ तारा दिसतात. परंतु दुर्बिणीतून पाहिले तर ९० पासून १०० किंवा अ