पान:ज्योतिर्विलास.pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. धूमकेतु. गुरुशुक्रतारादिक लहान तेजें आणि चंद्रसूर्यासारखी भव्य तेजें रोज आपण पाहतो. त्यांच्या गति नियमित आहेत. परंतु आगापिच्छा नसतां अकस्मात् चंद्राच्या २१।३० पट लांब किंवा कधी कधी अर्ध्या आकाशांत पसरलेले असें विलक्षण तेज रात्री दिसू लागले, किंवा सूर्य प्रकाशला असतांही त्याच्या प्रखर तेजाशी स्पर्धा करून दिवसास दिसू लागले, तर मनुष्य चकित होऊन जाईल. प्राचीन काळी सर्व देशांत धूमकेतु हा एक भयंकर उत्पात वाटत असे. सर्व राष्ट्रांच्या प्राचीन ग्रंथांत प्रत्येक धूमकेतूच्या उदयाचा काही तरी भयंकर गोष्टीशी संबंध वर्णिलेला आहे. सांप्रत केतूंशी आपला बराच परिचय झाला आहे; यामुळे त्यांचे फारसें भय वाटत नाही. तरी अज्ञ लोकांत त्यांचे भय अद्यापिही सर्व देशांत आहे. आणि वराहमिहिरानें वर्णिल्याप्रमाणे ह्या शिखींची गति अद्यापिही ज्योतिष्यांच्या आज्ञेत आलेली नाही असे म्हणण्यास हरकत नाही. नुकतीच सन १८८२ मध्ये पृथ्वी च्या दर्शनास आलेली धूमकेतूची भव्य स्वारी पुष्कळांनी पाहिली असेल. तथापि ज्यांनी कधीच धूमकेतु पाहिला नाही त्यांसही त्याचे स्वरूप कांहीसे कळाव म्हणून चित्रांक १५ ह्यांत एक धूमकेतु दाखविला आहे. नुसत्या डोळ्यांनी दिसणाऱ्या धूमकतूचे तीन भाग असतात. त्यांत सामान्य तारांप्रमाणे लहान मोठी एक तारा दि. सते. तिच्या भोंवतीं धुरासारखी लहानशी शेंडी असते; तिला शिखा म्हणता त. आणि पताकेसारखें एक मोठे शेपूट असते; त्यास केतु अथवा पुच्छ म्हणताचित्रांक १५-इ० स० १८३५ चा धूमकेतु. त. केतु शब्दाचा मूळचा अर्थ पताका असा आहे. तारा आणि शिखा या दोहों मिळून धूमकेतूचा अग्रभाग होतो. (याला इंग्लिश भाषेत केतूचे डोके म्हणतात.) तीन भाग स्पष्टपणे परस्परांपासून निरनिराळे दिसत नाहीत. त्यांत शिखा कोठे संपली आणि केतु कोठे लागला हे तर बऱ्याच प्रसंगी समजत नाही. कोणी पुच्छालाच शिखा (शेंडी) म्हणतात. व त्यामुळेच धूमकेतूला शेंडेनक्षत्र असें नांव पडले आहे. तथापि सर्वच धूमकेतूंना पुच्छ असते असे नाही. म्हणून तारा, शिखा आणि केतु असे तीन भाग माना