पान:ज्योतिर्विलास.pdf/183

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उल्का . १६७ नेहमी उल्का पडतात त्यांच्या उद्गमस्थानाविषयी व गमनमार्गाविषयी काही नियम दिसून येत नाही. परंतु उल्कावृष्टीतल्या उल्कांचे उद्गमस्थान आकाशांत नियमित असते. अर्थात् ते पृथ्वीच्या दैनंदिन भ्रमणाबरोबर आकाशांत तारांप्रमाणे फिरते. नोव्हेंबरांतल्या वृष्टीचे दोन व आगष्टांतल्या वृष्टीचा एक असे तीन मोठे अशनिसमूह आहेत, तसे निरनिराळे लहान समुदाय सुमारे १०० आहेत. व त्या प्रत्येकाचे उद्गमस्थान निराळे आहे. म उल्का आणि धूमकेतु यांचा संबंध इत्यादि आणखी काही गोष्टी पुढच्या प्रकरणांत येतील. CRERALLERS सार्वजनिक समस खेड, (यु.)